मुंबई - Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार, दिग्दर्शक प्रियदर्शन आणि निर्माती एकता कपूर हे त्रिकुट आगामी काळात एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. बॉलिवूडचा यशस्वी निर्माता प्रियदर्शनने 14 वर्षांनंतर अक्षयबरोबर काम करणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांनी यापूर्वी 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'गरम मसाला' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. एकता कपूर या नवीन प्रोजेक्टची निर्मिती करणार आहे. हा एक विनोदाची झलर असलेला भयपट असून याची कथा कल्पनारम्य असणार आहे.
एका न्यूजवायरला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शननं खुलासा केला आहे की त्यानं राम मंदिराच्या इतिहासाविषयीच्या माहितीपट मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं आहे आणि आता अक्षयबरोबर एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी काम करणार आहे. प्रियदर्शननं सांगितलं, "आता मी राममंदिराच्या इतिहासावरची माझी डॉक्युमेंट्परी सिरीज पूर्ण केली आहे. यानंतर मी अक्षय कुमार बरोबर माझ्या सर्वात महत्त्वाच्या चित्रपटावर काम सुरू करत आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करणार आहे. विनोदासह ही एक भयपटाची कल्पना आहे."
सुपरस्टार अक्षयबरोबरच्या सहकार्याबद्दल बोलताना प्रियदर्शन म्हणाला, "अक्षयबरोबर काम करणं नेहमीच आनंददायी असतं. आमच्या पहिल्या चित्रपटापासून ते या चित्रपटापर्यंत अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे. या जोडीदारासाठी मी एक चांगला विषय शोधत होतो. आता माझा विश्वास बसलाय की हाच तो विषय त्याच्यासाठी परफेक्ट आहे."
अक्षय कुमार आणि प्रियदर्शन जोडीचा हा आगामी काल्पनिक हॉरर चित्रपट एकता कपूर निर्मित करेल आणि जादुच्या पार्श्वभूमीवर भारतीय अंधश्रद्धेचा शोध घेईल. 'भूल भुलैया' फेम दिग्दर्शक प्रियदर्शनने सांगितले की, त्याच्या पहिल्या भयपटापेक्षा वेगळा असा हा जादूच्या पार्श्वभूमीवर एक कल्पनारम्य सेट असेल. भारतातील सर्वात जुन्या अंधश्रद्धांपैकी एक असलेल्या विषयाला यातून गवसणी घालण्यात येईल.
कामाच्या आघाडीवर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट सतरा दिवासापूर्वी रिलीज झाला असून अजूनही थिएटरमध्ये सुरू आहे. यात टायगर श्रॉफ आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा -