ETV Bharat / entertainment

अजय देवगणनं 'सन ऑफ सरदार 2'च्या शूटिंगला केली सुरुवात, मृणाल ठाकूरचा फर्स्ट लूक आला समोर - Sardaar 2 shoot First Look - SARDAAR 2 SHOOT FIRST LOOK

Son of Sardaar 2 shoot: अजय देवगणनं आजपासून त्याच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्यानं त्याच्या 'इंस्टाग्राम'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांचा फर्स्ट लूकही दिसत आहे.

Son of Sardaar 2 shoot
सन ऑफ सरदार 2 ('सन ऑफ सरदार 2'ची शूटिंग सुरू (Screen Grab - Teaser))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 12:37 PM IST

मुंबई - Son of Sardaar 2 shoot: 'सन ऑफ सरदार'च्या सीक्वेलची प्रतीक्षा संपली आहे. बऱ्याच दिवसांपासून 'सन ऑफ सरदार 2'ची चर्चा ही सोशल मीडियावर होताना दिसत होती. दरम्यान आज 6 ऑगस्ट रोजी अजय देवगणनं त्याच्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 5 ऑगस्टला अजय देवगणनं पत्नी काजोलचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान अजयनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अजय 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या शूटिंग सेटवर पूजा करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये, 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाच्या सेटवरून काही दृश्यं समोर आली आहेत. यात मुख्य अभिनेत्री मृणाल ठाकूरचा 'देसी लूक' दिसत आहे.

मृणाल ठाकूरचा पंजाबी लूक : व्हिडिओत अजय देवगण गुरुद्वारामध्ये प्रार्थना करताना दिसतोय आणि त्यानंतर त्याचा मुलगा आणि पुतण्या 'सन ऑफ सरदार 2' चित्रपटाचा क्लॅपबोर्ड हातात धरताना दिसतात. यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कुमार अरोरा काही सूचना देतात. व्हिडिओत चित्रपटाची मुख्य अभिनेत्री मृणाल ठाकूर देसी पंजाबी लूकमध्ये ढोल वाजवते आणि चंकी पांडे ढोलाच्या तालावर नाचतो. अजय देवगण सेटवर सरदारजीच्या भूमिकेत दिसतो. हा व्हिडिओ शेअर करत अजयनं यावर लिहिलं, "सन ऑफ सरदार 2' चित्रपटाचा प्रवास, प्रार्थना, आशीर्वाद आणि अप्रतिम टीमनं सुरू होत आहे."

अजय देवगणचं वर्कफ्रंट : 'सन ऑफ सरदार' हा चित्रपट 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अजय देवगणसह सोनाक्षी सिन्हा, जुही चावला, मुकुल देव, विंदू दारा सिंह आणि संजय दत्त हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले होते. आता या चित्रपटात सोनाक्षीऐवजी मृणाल ठाकूर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. तसेच संजय दत्तला व्हिसा न मिळाल्यानं शूटिंगमध्ये अडचणी येत आहेत. दरम्यान अजय देवगणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो पुढं 'दे दे प्यार दे 2', 'गोलमाल 5', 'रेड 2' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. "मैदान पाहणं चुकवू नका" म्हणत, सौरव गांगुलीनं केलं अजय देवगणचा चित्रपट पाहण्याचं आवाहन - Ajay Devgn starrer Maidan
  2. 'सिंघम'चा आज वाढदिवस, अजय देवगणचे 'हे' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Ajay Devgan birthday
  3. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.