ETV Bharat / entertainment

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवादरम्यान स्टार कपलचा एन्जॉय करतानाचा व्हिडिओ व्हायरल - AISHWARYA ABHISHEK ANANT RADHIKA

जामनगरमधील अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह समारंभात अभिषेक पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याबरोबर एन्जॉय करताना दिसला.

AISHWARYA RAI AND ABHISHEK BACHCHAN
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (अभिषेक-ऐश्वर्या (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2024, 10:08 PM IST

मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्न सोहळा डॉक्युमेंट्री व्हॅली ऑफ गॉड्स, जामनगर जिओ सिनेमावर प्रसारित होत आहे. जिओ सिनेमाच्या यूट्यूब चॅनलवर याचा टीझर व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची झलक देखील दिसत आहे. हे जोडपे एकत्र या कार्यक्रमात एन्जॉय करताना दिसत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या अफवा या अनंत आणि राधिकाच्या लग्ना दरम्यान झाल्या होत्या, कारण अभिषेकनं ऐश्वर्या आणि आराध्याबरोबर फोटोसाठी एकत्र पोझ दिली नव्हती. मात्र, व्हायरल झालेल्या टीझरमध्ये चित्र हे वेगळं पाहायला मिळत आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र : या टीझरमध्ये अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या लग्न सोहळ्यामध्ये एकत्र सोफ्यावर बसून एंजॉय करताना दिसत आहेत. या सोहळ्यामध्ये आराध्या ही आपल्या आई आणि वडिलांबरोबर खूप मजा करत आहे. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांचीही झलक पाहायला मिळाली आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवांदरम्यान हा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान यापूर्वी ऐश्वर्यानं देखील अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिनं अमिताभ यांचा आराध्याबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा पा-दादाजी...देव तुम्हाला सदैव आशीर्वाद देवो.'

अनंत आणि राधिका यांचा विवाह : अनंत आणि राधिकाच्या लग्न सोहळ्यात शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, राणी मुखर्जी, रणबीर कपूर आणि इतर अनेक नामांकित व्यक्तीनं हजेरी लावली होती. टीझर व्हिडिओमध्ये नीता अंबानी म्हटलं, 'जामनगरबद्दल आमच्या हृदयात एक विशेष स्थान आहे. माझा धाकटा मुलगा अनंतच्या लग्नाचा प्रसंग आला, तेव्हा माझ्या दोन इच्छा होत्या. प्रथम, मला आपले कल्चर साजरे करायचे होते आणि दुसरे म्हणजे मला आपल्या कला आणि संस्कृतीला आदरांजली वाहायची होती.' दरम्यान अनंत आणि राधिका यांचे जामनगरमध्ये लग्नापूर्वीचे पहिले सेलिब्रेशन तीन दिवस चालले. या सोहळ्यात पार्ट्याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर काही महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रूझवर देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनंत आणि राधिका यांचा विवाह मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडला. यामध्ये शुभ विवाह, शुभ आशीर्वाद आणि मंगल उत्सव या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समावेश होता.

हेही वाचा :

  1. ऐश्वर्या रायकडून अफवांना पूर्णविराम, अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
  2. आराध्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ऐश्वर्या रायनं आयफा येथील रिपोर्टर यांना केलं गप्प, जाणून घ्या प्रकरण - iifa 2024
  3. ऐश्वर्या रायनं घटस्फोटाच्या अफवांना पुन्हा ब्रेक लावला, पॅरिस फॅशन वीकमध्ये लग्नाची अंगठी आली चर्चेत - Paris Fashion Week 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.