ETV Bharat / entertainment

बाबा सिद्दिकी हत्याकांडानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ

बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडानंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आलीय. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Salman Khan security increased
सलमान खानच्या सुरक्षेत वाढ (ETV Bharat File Photo)

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांडानंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या जिवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन त्याची सुरक्षा वाढवण्यात आलीय. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आलीय. तसेच वांद्रे येथील सलमान खान रहात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटभोवतीसुद्धा सुरक्षा वाढविण्यात आलीय. मागील अनेक दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यातच मागील एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर गोळीबारदेखील झाला होता. अशातच सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर या टोळीची एक पोस्ट व्हायरल झालीय. यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त केलाय.

सलमान खानच्या घराबाहेर कडक सुरक्षा तैनात : सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्याने त्याच्या सुरक्षेसाठी ८ ते १० पोलिसांची तुकडी बंदुकांसह तैनात करण्यात आलीय. यापैकी काही पोलीस सलमानसोबत सगळीकडे जातील. त्याच्या घराच्या चारही बाजूला पोलीस तैनात केले गेलेत. तसेच सलमान खान कुठल्याही ठिकाणी जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची सुरक्षा तपासणीसुद्धा केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी अपार्टमेंट तसेच बँड स्टँडच्या आसपास जवळपास ६० हून अधिक साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आलेत, जे आजूबाजूला घडणाऱ्या संशयास्पद परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी २४ तास कार्यरत असतील. इतकेच नाही तर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर चेहऱ्याची ओळख पटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले असे हाय-रेज्झ्युलेशन सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा बसवले आहेत. हे कॅमेरे घराबाहेरून जाणाऱ्या व्यक्तींना सहज ओळखू शकतात. अशा प्रसंगी जर का एकच चेहरा तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा या कॅमेरात टिपला गेला, तर ते सिक्युरिटी सिस्टीमला अलर्ट करतील. तसेच कमांड सेंटरमध्ये असलेले पोलीस २४ तास या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवून असणार आहेत.

तब्बल ६० पोलीस तैनात : यापूर्वी एप्रिलमध्ये सलमानच्या घराबाहेर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस तैनात करण्यात आले होते. परंतु इतकी सुरक्षा व्यवस्था असूनही बिश्नोई गँगमधील लोकांनी सलमान खानच्या घराबाहेर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता सलमान खानच्या घराबाहेर अतिशय कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामध्ये महिला अधिकाऱ्यांसह तब्बल ६० पोलीस तैनात करण्यात आले असून, गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची बारकाईने कसून तपासणी केली जात आहे. आता कोणताही अनोळखी व्यक्ती गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर विनाकारण उभेदेखील राहता येणार नाही.

हेही वाचा -

  1. बाबा सिद्दीकींची हत्या करणारे आरोपी पुण्यात गोळा करायचे भंगार; आणखी एकाला अटक, पंजाब कनेक्शनही उघड
  2. लॉरेन्स गँगनं सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली? कथित पोस्टमध्ये दाऊदसह सलमान खानचाही उल्लेख
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.