मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभय देओलनं लैंगिकता आणि पुरुषत्वाबद्दलच्या त्याच्या विचारांवर प्रकाश टाकला आहे. लैंगिकतेची व्याख्या करण्यासाठी पाश्चात्य दृष्टिकोनाला त्यानं नाकारलं आहे. लैंगिकतेला कठोर लेबलांनी मर्यादित न ठेवता स्पेक्ट्रम म्हणून पाहण्यास प्राधान्य देण्याचं मत व्यक्त केलंय.
अभय देओलनं गेल्या अनेक वर्षांमध्ये हिंदी सिनेमातून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. नेहमीच्या मळलेल्या वाटेनं न जात त्यानं आपला स्वतःचा रस्ता या क्षेत्रात धुंडाळला आहे. दर्जेदार भूमिका साकारण्याकडं त्याचा नेहमीच कला राहिलाय. बाकीच्या स्टार्स प्रमाणे केवळ चमकत न राहता त्यानं चौकटी बाहेरच्या हटके भूमिका केल्या. अलिकडेच त्यानं एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी अशीच बिनधास्त मुलाखत देऊन स्वतःला व्यक्त केलंय. दिग्दर्शक, फराज आरिफ अन्सारी यांच्या 'बन टिक्की' या आगामी चित्रपटाविषयी चर्चा करताना त्याला 'लैंगिकतेची जाणीव कशी होते?' असा प्रश्न विचारण्यात आला होता.
अभय देओलचं विधान खुलं आणि चिंतनशील दोन्ही होतं. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "लैंगिकता ओळखण्याच्या पाश्चात्य पद्धतीला मी नकार देतो कारण ती खूप सरधोपट आहे. पूर्वेकडील दृष्टिकोन खूप वेगळा आहे, तो आपल्या सर्वांना ओळखतो. मी माझ्या लैंगिकतेची व्याख्या करत नाही आणि हे वादग्रस्त वाटू शकते परंतु माझ्यासाठी ते असे काही नाही की ज्याची व्याख्या करता येईल असे मला वाटते जेणेकरुन ते तुम्हाला एका बॉक्समध्ये ठेवू शकतील आणि तुम्हाला नीटपणे स्लॉट करू शकतील."
तो पुढे म्हणाला की, "मला वाटते की हे समोरच्या व्यक्तीच्या सोयीसाठी अधिक आहे, जेणेकरून ते तुम्हाला एका चौकटीमध्ये ठेवू शकतील, नीटनेटकेपणे तुम्हाला स्लॉट करू शकतील. मी स्वत: ला पाश्चात्य भाषेत का परिभाषित करावं? मी माझ्या आयुष्यातील सर्व अनुभवांना आलिंगन दिलं आहे आणि यापुढंही तसं करत राही. याला काय म्हणावं हे मला कळत नाही, मला त्याला काही लेबल द्यायचं नाही. माझ्या मते आपल्या सर्वांमध्ये पुरुष आणि स्त्रीत्व आहे, त्यामुळं माझ्या मते आपण सर्वजण ते आहोत."
अभय देओलचा आगामी चित्रपट 'बन टिक्की'मध्ये झीनत अमान आणि शबाना आझमी सारख्या प्रमुख कलाकारांच्या भूमिका आहेत. फराज आरिफ अन्सारी दिग्दर्शित, हा चित्रपट लिंग आणि लैंगिकतेशी संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास यावर प्रकाश टाकणार आहे. मनीष मल्होत्राच्या स्टेज 5 प्रॉडक्शनने बनवलेले आणि जिओ स्टुडिओच्या सहकार्यानं बनत असलेला 'बन टिक्की' हा चित्रपट अभय देओलच्या फिल्मोग्राफीमध्ये महत्त्वाची भर पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -