ETV Bharat / entertainment

दिवंगत 'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या पालकांची भेट घेऊन आमिर खानने केले सांत्वन - सुहानी भटनागर

Aamir Khan visits Suhani parents : दंगल मधील आमिर खानची सहकलाकार सुहानी भटनागर हिचे वयाच्या 19 व्या वर्षी 17 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. आमिर खानने तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.

Suhani Bhatnaga
सुहानी भटनागरच्या पालकांची भेट घेऊन आमिर खानने केले सांत्वन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 2:32 PM IST

मुंबई - Aamir Khan visits Suhani parents : आमिर खानने दिवंगत 'दंगल' अभिनेत्री सुहानी भटनागरच्या निधनानंतर काही दिवसांनी गुरूवारी संध्याकाळी फरीदाबादमध्ये जाऊन तिच्या शोकाकुल कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली. आमिरने शोक व्यक्त करताना सुहानीच्या आजाराची विचारपूस केली आणि तिच्या पालकांचे सांत्वन केले. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार सुहानीचे काका नवनीत भटनागर यांनी आमिर खानच्या भेटीच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

'दंगल' मध्ये तरुण बबिता फोगटची भूमिका करणाऱ्या सुहानीचे वयाच्या 19 व्या वर्षी डर्माटोमायोसिटिस या दुर्मिळ दाहक आजारामुळे निधन झाले. या आजारामुळे रुग्णाच्या त्वचेवर पुरळ येतात आणि स्नायूंचा अर्धांगवायू होतो. सुहानीचे वडील सुमित भटनागर यांनी खुलासा केला की तिच्या फुफ्फुसांना संसर्ग झाला होता आणि त्यात जास्त द्रव जमा झाला होता. या कठीण काळात आमिर खानने दाखवलेल्या सहानुभूतीमुळे शोकग्रस्त कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

सुहानीच्या मृत्यूनंतर, आमिर खानच्या प्रॉडक्शन स्टुडिओने एक निवेदन जारी केले होते आणि त्यात लिहिले होते की : "आमच्या सुहानीच्या निधनाबद्दल ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. तिची आई पूजाजी आणि संपूर्ण कुटुंबाला आमच्या मनःपूर्वक संवेदना आहेत. अशी प्रतिभावान तरुण मुलगी, अशी टीम प्लेयर. सुहानीशिवाय दंगल अपूर्ण राहिले असते."

सुहानीच्या आईने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुहानी आणि आमिर खान यांच्या जवळच्या नात्याबद्दल सांगितले आणि त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, "आमिर सर नेहमीच तिच्या संपर्कात असतात. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत. आम्ही आमिर यांना तिच्या आजारपणाबद्दल कधीच कधीच सांगितले नाही. प्रामाणिकपणे सांगायचे आम्ही कोणालाही या आजाराची माहिती दिली नव्हती."

सुहानीच्या आई पुढे म्हणाली होती की, "आम्ही जर आमिर खान यांना मेसेज जरी केला असता तरी त्यांचा फोन आला असता. त्यांचे आमच्या कुटुंबीयांशी खूप चागंले संबंध राहिले आहेत. त्यांनी आम्हाला त्यांची मुलगी आयरा खानच्या लग्नासाठीही आमंत्रण दिले होते. सुहानीला घेऊन या असा आठवणींनी त्यांनी फोनही केला होता."

हेही वाचा -

  1. जॅकी भगनानीसह लग्नात रकुल प्रीत सिंगची ब्राइडल एन्ट्री झाली व्हायरल
  2. सलमान खानच्या चेहरा रंगवलेल्या पँटसह फन्की एअरपोर्ट लूकने पाहणाऱ्यांचे डोळे विस्फारले
  3. 'आर्टिकल 370' बॉक्स ऑफिस ओपनिंग: यामी गौतम आणि प्रियामणीच्या चित्रपटाची उत्तम सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.