ETV Bharat / entertainment

'पुष्पा २: द रुल'चं काउंटडाउन पोस्टर रिलीज, अल्लु अर्जुनच्या चाहत्यांमध्ये नवा उत्साह - PUSHPA 2 THE RULE COUNTDOWN POSTER

Pushpa 2 The Rule Countdown Poster : 'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचं एक नवीन पोस्टर रिलीज केलं आहे.

Pushpa 2 The Rule Countdown Poster
पुष्पा २: द रुल काउंटडाउन पोस्टर ('पुष्पा 2: द रूल' पोस्टर (Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 23, 2024, 2:05 PM IST

हैदराबाद: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. नुकतेच निर्मात्यांनी चित्रपटाचं नवीन काउंटडाउन पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरच्या माध्यमातून निर्मात्यांनी चाहत्यांना आणि प्रेक्षकांना रिलीज तारखेची आठवण करून दिली आहे. हा चित्रपट या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होत आहे.

23 सप्टेंबर रोजी 'पुष्पा 2: द रुल' या आगामी चित्रपटाचं सोशल मीडियावर नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचे काउंटडाउन देखील देण्यात आले आहे. आता 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी फक्त 75 दिवस उरले आहेत.

'पुष्पा 2: द रुल'चे नवीन काउंटडाउन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'पुष्पा आणि त्याचा अफाट पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उरलेत 75 दिवस. पुष्पा 2 द रुल हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक अभूतपूर्व अध्याय लिहीणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी सिनेमात रिलीज होणार आहे.

निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या नव्या लाल पोस्टरमध्ये 'पुष्पराज' चंदनाकडे पाहताना दिसत आहे. मात्र, अल्लू अर्जुनचा चेहरा पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला नाही. पोस्टरमध्ये '75 दिवस बाकी' असे लिहिले आहे. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरनं चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

चाहते अनेक दिवसांपासून 'पुष्पा २ द रुल' चित्रपटाची वाट पाहत आहेत. याआधी हा चित्रपट 15 ऑगस्टला 'स्त्री 2' सोबत रिलीज होणार होता, पण 'पुष्पा 2'ची रिलीज डेट पुढे ढकलून 6 डिसेंबर करण्यात आली. आता अल्लू अर्जुनचा हा आगामी चित्रपट 6 डिसेंबरला 'छावा' या विकी कौशल अभिनित चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे. पुष्पा 2 हा चित्रपट 2024 या वर्षातील सर्वात प्रतीक्षेत चित्रपट आहे. यामध्ये अल्लू अर्जुन 'पुष्पराज'ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा तिच्या श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 - द रुल'मधील क्लायमॅक्सचं शूटिंग सुरू, व्हिडिओ क्लिप केली शेअर - pushpa 2 the rule
  2. 'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल फिसकटलं, 'पुष्पा'ची होणार 'छावा'शी टक्कर, रश्मिका मंदान्नाच्याही टेन्शनमध्ये वाढ - Pushpa 2 Vs Chhava
  3. सुकुमारनं रामोजी फिल्म सिटीमध्ये पुन्हा सुरू केलं 'पुष्पा 2' चं शूटिंग, जाणून घ्या अल्लू अर्जुन कधी होणार सामील - Pushpa 2 Update

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.