नवी दिल्ली Modi Government First Union Budget : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) मोदी 3.0 सरकारचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान निर्मला सीतारामन यांच्यासमोर महागाई नियंत्रणात ठेवत आर्थिक विकासाला चालना देण्याचं आव्हान होतं. तसंच मध्यमवर्गीयांसाठी कोणतेही मोठे धोरण बदल किंवा नवीन फायदे यावेळी दिसले नाहीत. त्यामुळं सर्वांचं लक्ष आजच्या अर्थसंकल्पाकडं लागलंय.
अर्थसंकल्प सादरीकरणाची अशी असेल टाईमलाईन
- आज सकाळी 11 वाजता 2024-25 चा बहुप्रतिक्षित पूर्ण अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर सादर केला जाईल. अर्थमंत्र्यांनी केलेल्या प्रमुख घोषणा आणि एकूणच अर्थव्यवस्थेबाबत सरकारचे दूरगामी मार्गदर्शन यावर सर्वांचं लक्ष असेल.
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 लोकसभेत सादर झाल्याच्या एका तासानंतर निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील. एनडीए घटक पक्षांच्या मागण्यांसह पंतप्रधान मोदींच्या ‘विकसित भारत 2047’ च्या सुसंगत वाटपाची सरकारची योजना कशी असेल? हे पाहणं महत्वाचं ठरेल.
- वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा 2003 च्या कलम 3 च्या उपकलम (1) अंतर्गत, अर्थमंत्री टेबलवर पुढील पेपर्सची प्रत्येकी एक प्रत (इंग्रजी आणि हिंदीमध्ये) ठेवतील. यामध्ये मध्यम मुदतीचे वित्तीय धोरण विधान आणि मॅक्रो-इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट यांचा समावेश आहे.
- त्या जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या (विधानमंडळासह) अंदाजे प्राप्ती आणि खर्च टेबलवर ठेवतील.
- या आगामी अर्थसंकल्प सादरीकरणासह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन या माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी स्थापित केलेल्या विक्रमाला मागे टाकतील. मोरारजी देसाई यांनी 1959 ते 1964 दरम्यान अर्थमंत्री म्हणून पाच वार्षिक अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केले.
- अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहात सविस्तर चर्चा केली जाते. यामुळे सदस्यांना त्यातील तरतुदींची छाननी करता येते. तसंच दुरुस्त्या प्रस्तावितही करता येतात.
- मागील काही पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पांप्रमाणे, 2024 चा अर्थसंकल्प देखील पेपरलेस स्वरूपात सादर केला जाईल. वर्षाच्या उत्तरार्धात देशात सार्वत्रिक निवडणुका होणार असल्यानं 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 सादर करण्यात आला. दरम्यान, सर्व केंद्रीय अर्थसंकल्प दस्तऐवज, वार्षिक आर्थिक विवरण, अनुदानाची मागणी आणि राज्यघटनेनं विहित केलेले वित्त विधेयक 'केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल ॲप' वर उपलब्ध असेल.
हेही वाचा -
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 : थोड्याच वेळात केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर ; काय आहेत व्यावसायिकांच्या अपेक्षा - Budget 2024 Expectations
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाच्या पोतडीतून महाराष्ट्रासाठी काय निघणार? जोरदार उत्सुकता - Union Budget 2024
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024 ; कोण आहेत ते केंद्रीय अर्थमंत्री ज्यांनी एकदाही सादर केला नाही अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थसंकल्पाबाबत मनोरंजक माहिती - Union Budget 2024