हैदराबाद World Food Safety Day 2024: लोकांना निरोगी आणि पौष्टिक आहाराबद्दल जागरूक करणं फार महत्वाचं झालं आहे. कारण दिवसेंदिवस लोकांच्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल होताना दिसत आहे. लहान मुले आणि महिला जंक फुडचे जास्त प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे पोटाशी संबंधित आजारांचा त्यांना सामना करावा लागतो. कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि अन्य विषबाधा सारख्या समस्या दूषित आहार सेवन केल्यामुळे होतात. यामुळे अन्न सुरक्षेबद्दल लोकांना जागृक करणं महत्वाचं झालं आहे. याच उद्देशानं जगभरात 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात येतो.
काय आहे अन्न सुरक्षा दिवस: 18 डिसेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभा अन्न आणि कृषि संघटना(FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी संयुक्तपणे अन्न सुरक्षा दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला. 7 जून 2019 रोजी पहिल्यांदा जागतिक सुरक्षा दिवस साजरा करण्यात आला. आरोग्य, भूक आणि शेतीशी संबंधित उद्दिष्टे साध्य करण्याच्या उद्देशानं त्याचबरोबर अन्न सुरक्षेच्या गरजांकडे लक्ष वेधणे हा उद्देश्य आहे.
दूषित अन्नामुळे १.२५ लाख मुले मृत्युमुखी पडतात: अन्नजन्य आजारांची अंदाजे 600 दशलक्ष प्रकरणं दरवर्षी नोंदवली जातात. असुरक्षित अन्नामुळे मानवी आरोग्य आणि अर्थव्यवस्था धोक्यात आहे. याचा मुलं, स्त्रिया आणि स्थलांतरितांवर जास्त परिणाम होतो. जगभरात अंदाजे दरवर्षी 4,20,000 लोकांचा दूषित अन्न खाल्ल्यानं मृत्यू होतो. 5 वर्षांपेक्षा कमी वयाची ४० टक्के मुले दूषित किंवा रोगजंतुनं घेतलेल्या अन्नामुळे मरतात. यामुळे दरवर्षी 125,000 मृत्यू होतात.
- जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम : यंदाची जागतिक अन्न सुरक्षा दिनाची थीम 'अन्न सुरक्षा:अनपेक्षित गोष्टीसाठी तयार व्हा' अशी आहे.
अन्न संकटाशी संबंधित काही तथ्ये
- दरवर्षी 600 दशलक्ष लोक दूषित अन्न खाल्यानं आजारी पडतात.
- संयुक्त राष्ट्रांच्या मते 2022 या वर्षात ८२८ दशलक्ष लोक उपासमारीनं त्रस्त होते. कोविड महामारी, संघर्ष आणि हवामान बदलामुळे ही संख्या आणखी वाढली आहे.
- जगात 3 पैकी 1 व्यक्ती कुपोषित आहे.
- 2012 पासून अन्न संकटाचा सामना करणाऱ्या लोकांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हेही वाचा