ETV Bharat / bharat

वायनाड भूस्खलन प्रकरण : मृत्यूचा आकडा पोहोचला 308 वर; शोधकार्य सुरूच, आरोग्य मंत्र्यांनी दिली 'ही' माहिती - Wayanad Landslide Rescue - WAYANAD LANDSLIDE RESCUE

Wayanad Landslide Rescue : वायनाड इथल्या भूस्खलनात आतापर्यंत 308 नागरिकांचा बळी गेला आहे. आज चौथ्या दिवशीही वायनाड इथं शोध आणि बचावकार्य सुरू आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी मृतांचा आकडा 308 वर थांबल्याची माहिती दिली आहे.

Wayanad Landslide Rescue
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 11:24 AM IST

तिरुअनंतपूरम Wayanad Landslide Rescue : वायनाड इथं भूस्खलन होऊन तब्बल 308 नागरिकांचा बळी गेला आहे. वायनाडमधील मुंडाक्काई आणि चुरालमाला या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं आहे. या ठिकाणी अद्यापही शोध आणि बचावकार्य करण्यात येत आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती निवारण आणि बचाव पथकाचे जवान शोधमोहीम राबवत आहेत. दरम्यान केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी वायनाड भूस्खलनातील मृत्यूचा आकडा 308 वर पोहोचल्याची माहिती दिली आहे.

वायनाडमध्ये भूस्खलन होऊन 308 नागरिकांचा बळी : केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्मडीच्या जंगलात भूस्खलन होऊन तब्बल 308 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 30 जुलैला ही दुर्घटना झाल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. मेप्पडीच्या डोंगरात झालेल्या या घटनेत नागरिकांची घरं आणि वाहनं वाहून गेली. चार दिवसानंतरही या ठिकाणी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल आणि भारतीय हवाई दलाचीही मदत घेण्यात आली आहे. मंगळवारी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं भूस्खलनात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करत सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं.

आज सहा भागात राबवण्यात येणार शोधमोहीम : वायनाड भूस्खलन अपघाताला आज चार दिवस झाले आहेत. या भूस्खलनात मृतांचा आकडा 308 वर पोहोचला आहे. मृतांचा आकडा आणखीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज बचाव पथकाच्या वतीनं सहा भागात शोधकार्य करण्यात येणार आहे. आज चाळीयारमध्येही शोध करण्यात येणार आहे.

बेली ब्रिजचं बांधकाम पूर्ण : घटनास्थळावरील तात्पुरता बांधण्यात आलेला पूल कोसळल्यानं बचाव पथकातील जवानांना मोठ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागलं आहे. मात्र सैन्य दलाच्या जवानांनी आणि एनडीआरएफच्या जवानांनी मोठी कसरत करत बेली ब्रिजचं काम पूर्ण केलं. त्यामुळे आज बचावकार्याला गती मिळणार आहे. या पुलावरुन जेसीबीसह वाहनं आणि आपत्ती व्यवस्थापनातील यंत्रसामुग्री घटनास्थली नेणं सुकर होणार आहे. त्यामुळे घटनास्थळी आज आणखी मृतदेह आढळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरुन कोणीही जीवंत आढळून आलं नसल्याचं गुरुवारीच सैन्य दलाच्या वतीनं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा :

वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 250 वर; मदत आणि बचाव कार्य सुरूच - Wayanad Landslide Rescue Operations

केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; 93 जणांचा मृत्यू, भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन - Massive landslides In Kerala

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.