ETV Bharat / bharat

उमेदवारांची ओळख उघड न करता NEET चे निकाल प्रकाशित करा; सर्वोच्च न्यायालयाचे 'NTA' ला आदेश - NEET UG Paper Leak Case - NEET UG PAPER LEAK CASE

NEET UG Paper Leak Case : सर्वोच्च न्यायालयानं NTA ला शहर तसंच केंद्रनिहाय NEET UG परीक्षेचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. NEET-UG पेपर फुटी तसंच इतर अनेक विषयांवरील याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Dhananjay Chandrachud
नीट पेपर फूट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 6:28 PM IST

Updated : Jul 18, 2024, 7:02 PM IST

नवी दिल्ली NEET UG Paper Leak Case : NEET-UG पेपर लीक प्रकरणी गुरुवारी (18 जुलै) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी NTA (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) ला उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएनं हे निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित करावेत, असं सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले. न्यायमूर्ती परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठानं गुरुवारी वादग्रस्त NEET-UG 2024 परीक्षाशी संबंधित सर्व याचिका निकाली काढल्या आहेत.

परीक्षा केंद्रांचा निकाल स्वतंत्र जाहीर करा : प्रत्येक परीक्षा केंद्राचा निकाल स्वतंत्र जाहीर करावा, असा आदेश देत या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी (22 जुलै) होणार असल्याचंही सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितलं. तसंच EOW अहवाल देखील सोमवारी सादर केरण्याचे आदेश त्यांनी दिले. या सुनावणीदरम्यान NTA नं न्यायालयाला सांगितलं की, NEET-UG समुपदेशन 24 जुलैपासून सुरू होईल.

पेपर फुटल्याची वस्तुस्थिती : या सुनावणीदरम्यान ॲडव्होकेट जनरल तुषार मेहता यांनी परीक्षा केंद्रांची घोषणा करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली. तथापि, निकाल केंद्रीय पद्धतीनं घोषित केल्यामुळं डेटाचं स्वरूप स्पष्ट होईल, असं न्यायाधीश म्हणाले. दरम्यान, डीवाय चंद्रचूड म्हणाले की, पाटणा, हजारीबागमध्ये पेपर फुटला ही वस्तुस्थिती आहे. कारण परीक्षेपूर्वी अनेकांकडं प्रश्नपत्रिका उपलब्ध होती.

सर्व बाजू तपासून निर्णय देणार : "केंद्रनिहाय निकाल जाहीर केले पाहिजेत, जेणेकरून गुणांचं स्वरूप स्पष्ट होईल," असं न्यायालयानं नमूद केलं. या सुनावणीत, एनटीएनं सांगितलं की, "आमच्याकडून परीक्षेच्या नियोजनात कोणतीही कमी राहिली नाही. याचिकाकर्त्यांचे आमच्यावरील आरोप खोटे आहेत." यावर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की, "वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2024 पुन्हा घेण्यासाठी संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर परिणाम झाल्याचे ठोस पुरावे असले पाहिजेत. या प्रकरणावर लवकरच अंतिम निर्णय देऊ. लाखो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्व बाजू बघून, पुरावे बघून निर्णय द्यायचा आहे."

हे वाचलंत का :

  1. आणखी एक 'नीट' घोळ; फेरपरीक्षा दिली नसताना नव्या गुणपत्रिकेत घटले विद्यार्थीनीचे गुण - NEET Exam Scam
  2. एनटीए, केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं शपथपत्र; 'ते' व्हिडिओ बनावट असल्याचा एनटीएचा दावा - NEET Paper Leak Case
  3. नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; लातूरमधून आणखी एकाला अटक - NEET Paper Leak

Last Updated : Jul 18, 2024, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.