ETV Bharat / bharat

Student brutally murdered : एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह - Student brutally murdered

Student brutally murdered : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुनं विद्यार्थीनीची हत्या केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

UP Crime News: एकतर्फा प्रेमातून विद्यार्थीनीची हत्या, रस्त्याच्या कडेला फेकला मृतदेह

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 15, 2024, 12:31 PM IST

एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या

इटावा (उत्तर प्रदेश) Student brutally murdered : उत्तर प्रदेशातील सैफई मेडिकल कॉलेजच्या (Saifai Medical College) पॅरामेडिकल विद्यार्थिनीची हत्या करुन तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला. याप्रकरणी विद्यार्थीनीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली कार आणि ज्या स्क्रू ड्रायव्हरनं खून केला होता, तोही जप्त करण्यात आलाय. एकतर्फी प्रेमात वेड लागलेल्या व्यक्तीनं विद्यार्थिनीची हत्या (student brutally murdered) केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. ही घटना कशी घडली याचा तपास पोलीस करत आहेत. तत्पूर्वी गुरुवारी रात्री हत्येची माहिती मिळताच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले. त्यांनी ट्रॉमा सेंटरसमोर गोंधळ घातला आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले.

सोनई नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह : गुरुवारी रात्री आठच्या सुमारास सोनई नदीच्या पुलाजवळ रस्त्याच्या कडेला मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती वैदपुरा पोलिसांना मिळाली. यावर एसओ समित कुमार पोलीस फौजफाट्यासह पोहोचले. तिथं तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता ती मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. तिथं ओळख पटली.

वर्गात नसल्यास कुटुंबातील सदस्यांना माहिती : ही विद्यार्थीनी एएनएमच्या पहिल्या वर्षात होती आणि वसतिगृहात राहत होती. पोलिसांच्या चौकशीत ही विद्यार्थीनी सकाळी आठच्या सुमारास ओपीडीमध्ये ड्युटीसाठी गेल्याचं उघड झालं. रात्री एक वाजता ती तेथून परतली. 2 वाजेपासून वर्ग सुरू होतात. यात ती उपस्थित न राहिल्यानं वॉर्डन नीलम शाह यांनी कुटुंबीयांना माहिती दिली. पोलिसांकडून विद्यार्थ्याच्या हत्येची माहिती मिळताच विद्यार्थी संतप्त झाले. ट्रॉमा सेंटरबाहेर मोठ्या संख्येनं विद्यार्थी जमले होते.

अखिलेश यादव यांचा सरकारवर हल्लाबोल : या घटनेवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ट्विट करुन योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, "सैफई विद्यापीठात विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. उत्तर प्रदेशात भाजपाच्या काळात गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहिष्णुतेचं घोषित धोरण शून्यावर आणण्याचं हे आणखी एक दुःखद उदाहरण आहे."

मुख्य आरोपीला अटक : याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यामध्ये महेंद्र, अरविंद आणि एका अज्ञाताचा समावेश आहे. महेंद्र हा घराजवळ राहत असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्रनं या विद्यार्थिनीची हत्या एकतर्फी प्रेमातून केली. या खुनाच्या घटनेत वापरलेली कारही जप्त करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरनं वार करुन खून करण्यात आलाय. तसंच अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. Youth Father Murder Case : सुनेला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या वडिलांची हत्या, आई आणि भावावरही खुनी हल्ला
  2. Mumbai Murder News: दागिने शोरुम मालकाच्या पत्नीची घरातील नोकराकडून हत्या, बिहारला पळून जाताना रेल्वे स्थानकातून अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.