ETV Bharat / bharat

Sabarmati Express Accident : अजमेरजवळ रेल्वेचा भीषण अपघात; रेल्वे स्थानकावर उभ्या मालगाडीला धडकली साबरमती एक्सप्रेस - sabarmati express collides

Sabarmati Express Accident : अजमेरच्या मदार स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून येणाऱ्या साबरमती एक्सप्रेसनं धडक दिली. त्यामुळं साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. या अपघातात साबरमती एक्स्प्रेसचं इंजिन आणि 4 डबे रुळावरुन घसरले. सध्या प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

Sabarmati Express: अजमेरजवळ रेल्वेचा भीषण अपघात; रेल्वे स्थानकावर उभ्या मालगाडीला धडकली साबरमती एक्सप्रेस

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 10:35 AM IST

अजमेरजवळ रेल्वेचा भीषण अपघात

अजमेर (राजस्थान) Sabarmati Express Accident : राजस्थानातील अजमेरच्या मदार स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात झालाय. या रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून येणाऱ्या रेल्वेनं धडक दिल्यानं मालगाडी रुळावरुन घसरली. मदार स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसनं उभ्या असलेल्या मालगाडीला धडक दिली. त्यामुळं साबरमती एक्स्प्रेसचे इंजिन आणि 4 डबे रुळावरुन घसरले. सध्या तरी या अपघातात एकही प्रवासी जखमी न झाल्याची माहिती समोर आली नाही. तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झालीय. घटनास्थळी मदतकार्य सुरू झालंय. रेल्वेनं अजमेर रेल्वे स्थानकावर मदतीसाठी हेल्प डेस्क उभारलाय.

अपघातस्थळी मदतकार्य सुरू : रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शशी किरण यांनी सांगितलं की, "ट्रेन क्रमांक 12548 साबरमती-आग्रा कँट रेल्वे रुळावरुन घसरलीय. हा अपघात मध्यरात्री 1.04 वाजता झाला." या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात खळबळ उडाली. अपघातवेळी ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रेल्वेचे अधिकारी तसंच अपघातग्रस्त मदत वाहनही घटनास्थळी पोहोचलं आहे. सध्या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरू झालंय. तर अपघातग्रस्त रेल्वेचा मागचा भाग अजमेर रेल्वे स्थानकाच्या दिशेनं नेला जातोय.

  • वाहतूक पुर्ववत होण्यास लागणार आठ तास : या अपघातामुळं रेल्वे रुळ पुन्हा सुरू होण्यासाठी 8 तास लागणार असल्याचं सांगण्यात येतंय. या अपघातामुळं या मार्गावरील पाच गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रेल्वेत बसलेल्या प्रवाशांना दुसऱ्या रेल्वेनं अजमेर रेल्वे स्थानकावर नेण्यात आलं.

पाच गाड्या रद्द : या अपघातामुळं या रेल्वे मार्गावरील गाडी क्रमांक 12065 अजमेर-दिल्ली सराय रोहिल्ला, गाडी क्रमांक 22987 अजमेर-आग्रा फोर्ट, गाडी क्रमांक 09605 अजमेर-गंगापूर सिटी, गाडी क्रमांक 09639 अजमेर-रेवाडी आणि गाडी क्रमांक 19435 जयपूर-मारवाड एक्सप्रेस या पाच रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. तर गाडी क्रमांक 12915 साबरमती दिल्ली, गाडी क्रमांक 17020 हैदराबाद हिसार एक्सप्रेस या दोन गाड्यांचा मार्ग बदलण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. Mumbai Railway Station Rename : मुंबईतील रेल्वे स्थानकांना मिळणार नवी ओळख; ब्रिटिशकालीन स्थानकांचं होणार नामांतर
  2. जामतारा येथे रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.