ETV Bharat / bharat

यंदा 'या' तारखेला साजरं होणार 'रक्षाबंधन'; शुभ मुहूर्त आणि महत्त्व वाचा एका क्लिकवर... - Raksha Bandhan 2024 - RAKSHA BANDHAN 2024

Raksha Bandhan 2024 : श्रावण पौर्णिमेला 'रक्षाबंधन' (Rakhi Purnima) आणि 'नारळी पौर्णिमा' (Narali Purnima 2024 ) साजरी केली जाते. बहीण-भावाच्या पवित्र नात्याचे प्रतिक असलेला 'रक्षाबंधन' सण यंदा 19 ऑगस्टला साजरा होणार आहे. परंतु, यंदा रक्षाबंधनचा नेमका मुहूर्त केव्हा आहे जाणून घेऊयात...

Raksha Bandhan 2024
रक्षाबंधन 2024 (Etv Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 2:16 PM IST

हैदराबाद Raksha Bandhan 2024 : श्रावण महिन्यात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते. 'रक्षाबंधन' म्हणजे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण. या शुभ दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या मनगटावर एक पवित्र धागा बाधून ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. भाऊही बहिणीला भेटवस्तू देऊन तिचा सन्मान करतो.

रक्षाबंधनाचा मुहूर्त ? : हिंदू पंचागानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला (19 ऑगस्ट 2024) रोजी सोमवारी रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनासाठी शुभमुहूर्त मुहूर्त दुपारी 1 वाजून 43 मिनिटांपासून ते रात्री 9 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे.

असं सजवा राखीचे ताट : राखीचं ताट सजवणं हे प्रत्येक बहिणीसाठी खूप खास असतं. भावाला राखी बांधण्याआधी बहीण राखीच्या ताटाला प्रेमाने सजवते. पूजेच्या ताटात कुंकू, तांदूळ ठेवा. पूजेच्यावेळी भावाच्या कपाळावर टिळा लावून अक्षता लावा. ताटात तुपाचा दिवा लावा. आरती करून आणि राखी बांधल्यानंतर बहिणी आपल्या भावांना मिठाई देते. म्हणूनच ताटात मिठाई असणं आवश्यक आहे.

शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्यावी : रक्षाबंधनाच्या दिवशी भावांना राखी बांधताना शुभ मुहूर्ताची विशेष काळजी घ्यावी. राखी बांधताना भाऊ किंवा बहिणीने दक्षिणेकडं तोंड करू नये, राखीच्या दिवशी भावाला टिळक लावण्यासाठी चंदन वापरावे. या काळात सिंदूर वापरू नये, असं सांगितलं जातं.

काय आहे नारळी पौर्णिमा : नारळी पौर्णिमेला कोळी बांधव आणि समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करुन मोठ्या उत्साहानं हा सण साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. कोळी बांधवाचा 'नारळी पौर्णिमा' हा महत्त्वाचा सण आहे. नारळी पौर्णिमेनंतर बंद असलेल्या मच्छिमारी व्यवसाय पुन्हा सुरू केली जाते. म्हणूनच या सणाला कोळी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.

(टीप: सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

हेही वाचा -

  1. रक्षाबंधनासाठी पोस्टाची खास भेट; राखीच्या चित्रांचे रंगीबेरंगी वॉटरप्रूफ 'राखी लिफाफे' तयार - Post Office Raksha Bandhan
  2. World Largest Rakhi : कधीकाळी दरोडेखोरांचा जिल्हा असलेल्या चंबळमध्ये जगातील सर्वात मोठी राखी, पहा व्हिडिओ
  3. राष्ट्रीय मैत्री दिन 2024; मित्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी होतो मैत्री दिन साजरा ; जाणून घ्या इतिहास आणि महत्व - National Friendship Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.