ETV Bharat / bharat

पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? आयएएस पदावरून काढण्याकरिता 'हे' आहेत नियम - IAS POOJA KHEDKAR CASE - IAS POOJA KHEDKAR CASE

IAS Pooja Khedkar Case : बनावट प्रमाणपत्राच्या वादात अडकलेल्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नोकरीवर टांगती तलावर आहे. पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक समिती स्थापन केली आहे. प्रमाणपत्र फसवणूक प्रकरणात पूजा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न सध्या उपस्थित केल्या जातोय. याबाबत नियम जाणून घेऊ.

Who can dismiss IAS Officers UPSC action in Pooja Khedkar Case rules governing civil servants
पूजा खेडकर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 7:38 AM IST

हैदराबाद IAS Pooja Khedkar Case : परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बनावट प्रमाणपत्राचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरीकडून महाराष्ट्रामधील पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कार्यक्रमही रद्द केलाय. इतकंच नाही तर केंद्रीय लोकसेवा आयोगानं (यूपीएससी) पूजा खेडकरविरोधात गुन्हाही नोंदवलाय. यापुढे काय कारवाई केली जाऊ शकते?

आयएएस अधिकाऱ्याला नोकरीवरुन काढणं सोपं नाही. आयएएस अधिकाऱ्याला नोकरीवरून कोण काढू शकते? हा प्रश्न अजूनही कायम चर्चेत आहे. यूपीएससी कोणत्याही IAS, IPS, IFS किंवा IRS अधिकाऱ्याची नोकरी संपुष्टात आणू शकते का? असाही प्रश्न उपस्थित केल्या जातोय. याच पार्श्वभूमीवर आपण पूजा खेडकर यांना आपली नोकरी गमवावी लागेल की नाही? यासंदर्भात जाणून घेऊया.

UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार नागरी सेवा परीक्षेला बसतात. त्यातीस काहीजण परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होतात. या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी दिली जाते. अशा परिस्थितीत, जर एखाद्या आयएएसनं काही चुकीचं काम केलं असेल तर त्याला सहजपणे पदावरून हटविलं जाता येत नाही. परंतु, केवळ एका व्यक्तीकडं या अधिकाऱ्याला आपल्या पदावरुन हटविण्याचा अधिकार असतो.

  • कलम 311 मध्ये नोकरी संपुष्टात आणण्याची तरतूद : IAS अधिकाऱ्याच्या नोकरीच्या समाप्तीशी संबंधित नियम घटनेच्या कलम 311 मध्ये आहेत. घटनेच्या कलम 311 (2) नुसार, जर एखाद्या IAS अधिकाऱ्याला गुन्ह्यात शिक्षा झाली तर त्याची रँक कमी केली जाऊ शकते. त्याला पदावरुनही हटविलं जाऊ शकतं.
  • कलम 310 नुसार काय अधिकार आहेत? : केवळ राष्ट्रपती कोणत्याही IAS, IPS, IFS किंवा IRS अधिकाऱ्याला काढून टाकू शकतात. केंद्र किंवा राज्य सरकारही कोणत्याही अधिकाऱ्याला बडतर्फ करू शकत नाही. आयएएस अधिकाऱ्याला काढून टाकण्याचा अधिकार राज्य सरकारला नसला तरी ते त्याला निलंबित करू शकतात. मात्र, राज्य सरकारकडून आयएएस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं तर हे त्यांना 48 तासांच्या आत संवर्ग नियंत्रण प्राधिकरणाला कळवावं लागते.

पूजा खेडकर प्रकरणात आतापर्यंत काय घडलं? : पूजा खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुण्यात नियुक्ती मिळाली होती. मात्र, यावेळी त्यांनी कामावर रुजू होण्यापूर्वीच विविध अवास्तव मागण्या करणं सुरू केलं. यावरुन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर पूजा खेडकर यांची बदली वाशिममध्ये करण्यात आली. मात्र, त्यानंतरही त्यांच्याबद्दल अनेक मुद्दे समोर आल्यानंतर युपीएसीनं त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. तसंच पूजा खेडकर यांना लालबहादूर शास्त्री अकादमीमध्ये पुन्हा बोलावण्यात आलं. त्यानंतर यूपीएससीमार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार पूजा खेडकर यांच्याबाबतच्या गैरप्रकारांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं यूपीएससीकडून जाहीर करण्यात आलं. त्यानंतर पूजा खेडकर यांनी मसूरीमध्ये अकादमीमध्ये जाणं अपेक्षित होतं. परंतु त्या अजूनही अकादमीत हजर झालेल्या नाहीत. त्यामुळं आता त्यांच्यावर यूपीएससी आणि दिल्ली पोलीस काय कारवाई करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा -

  1. "पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिले दोन पत्ते; मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा" - Vijay Kumbhar on Pooja Khedkar
  2. पूजा खेडकर पोहोचल्याच नाही मसुरीला; विजय कुंभार यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र, 'ही' केली मागणी - Vijay Kumbhar on Pooja Khedkar
  3. आई-वडिलांचा घटस्फोट; तरीही पूजा खेडकर नॉन क्रिमीलेअरसाठी अपात्र - सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार - Pooja Khedkar Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.