ETV Bharat / bharat

बंगळुरुमध्ये नायजेरियन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; 8 परदेशी नागरिकांना अटक - 8 Foreign Nationals Arrested - 8 FOREIGN NATIONALS ARRESTED

8 Foreign Nationals Arrested : टक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आफ्रिकन नागरिकांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरु ग्रामीण भागातील राजनुकुंटे पोलीस स्टेशन अंतर्गत मावल्लीपुरा इथं घडली होती. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आलीय.

बंगळुरूमध्ये नायजेरियन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; 8 परदेशी नागरिकांना अटक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 3:32 PM IST

बेंगळुरु 8 Foreign Nationals Arrested : केंद्रीय गुन्हे शाखा (सीसीबी) नं पोलिसांवर हल्ला करणाऱ्या नायजेरियन गुंडांना सीसीबी पोलिसांनी अटक केलीय. राजनकुंटेजवळ सुमारे आठ नायजेरियन गुंडांना अटक करण्यात आलीय. हल्ला करणाऱ्या गुंडांना पकडण्यासाठी सीसीबी पोलिसांसह डिस्वाट फोर्स तैनात करण्यात आले होते. डिस्वाट आणि सीसीबी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी कारवाई करत 8 जणांना अटक केलीय.

प्रकरणाची पार्श्वभूमी काय : अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आफ्रिकन नागरिकांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा बेंगळुरु ग्रामीण भागातील राजनुकुंटे पोलीस स्टेशन अंतर्गत मावल्लीपुरा इथं घडली होती. याठिकाणी सीसीबीचे निरीक्षक सुब्रह्मण्यस्वामी यांच्यासह पाचहून अधिक कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. मावल्लीपुरा येथील एका घरात अंमली पदार्थांचं सेवन आणि साठा असल्याची माहिती मिळवणाऱ्या सीसीबी पोलिसांच्या पथकानं रात्री उशिरा कारवाई केली होती.

आरोपींचा पोलिसांवरच हल्ला : त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांच्या साथीदारांना बोलावलं आणि इतर चार जण त्यांच्यासोबत सामील झाले. सहाही आरोपींनी घरातून पळून गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. पोलीस पळून जात असताना आरोपींनी त्यांच्या गाडीचे नुकसान केले.यानंतर सीसीबी पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलीस हेल्पलाइनवर फोन केला. ही माहिती मिळताच घटनास्थळी आलेल्या राजनुकुंटे पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांवरही आरोपींनी हल्ला करुन तिथून पळ काढला. या घटनेत पोलीस कर्मचारी जखमी झाले. सीसीबी युनिटची जीप आणि राजानुकुंटे पोलिस ठाण्याच्या जीपच्या खिडक्यांच्या काचाही या आरोपींनी फोडल्या होत्या. याप्रकरणी आता आठ जणांना अटक करण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. वाहन चोरीच्या संशयावरुन 25 वर्षीय मजुराला बेदम मारहाण करत खून; आरोपीला पोलिसांकडून अटक - Mumbai Crime News
  2. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांना गुजरातमधून अटक, मुंबईत विमानानं आणून आज होणार चौकशी - Salman Khans house firing case
  3. मिनी काश्मिरात गावठी बंदुकीनं पिसोरी हरणाची शिकार; बंदुकीसह काडतूस, कोयता जप्त, चौघांवर गुन्हा दाखल - Satara Crime News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.