ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणूक 2024: महाविकास आघाडीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील, काँग्रेस अंतर्गत सर्वेक्षणातील निष्कर्ष

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील असं काँग्रेसच्या अंतर्गत अहवालात नमूद आहे. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, अशी शक्यताही आहे.

Maharashtra Assembly Election 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 12 hours ago

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी आता अत्युच्च शिखरावर पोहोचली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. आता अशातच काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला राज्यातील 288 पैकी 150 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्वेक्षणात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं येऊ शकते, असंही नमूद करण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. मात्र महाविकास आघाडीनं निवढणुकीपूर्व केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून त्यांना 150 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्र सरकार आणि गुजरातला उद्योग पळवणं याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. त्यासह शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना फोडण्याचा फटका महायुतीला बसणार असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांना फोडल्याचा फटका भाजपावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लोकभावना महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता या सर्वेक्षणात नमूद करण्यात आली आहे.

काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून येऊ शकतो उदयास : काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेक्षणात महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत बोलताना काँग्रेसचे निरीक्षक टी एस सिंह देव यांनी ईटीव्ही भारतला बोलताना सांगितलं की, "महाविकास आघाडी 150 जागा जिंकण्याची शक्यता आहे. काँग्रेस हा महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ण्हणून उदयास येऊ शकतो. मात्र काँग्रेसचे मित्रपक्ष कशी कामगिरी करतात, यावर सगळं अवलंबून आहे. काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात काँग्रेस 102 पैकी 50 किंवा 60 जागा, उबाठा 95 पैकी 50 जागा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 85 पैकी 50 जिंकण्याची शक्यता आहे. तर उर्वरित काँग्रेसच्या मित्रपक्ष लढवत असलेल्या 7 जागांपैकी 3 ते 4 जिंकेल," असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्याचा भाजपाला फटका ? : काँग्रेसचे महाराष्ट्र निरीक्षक तथा छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी एस सिंहदेव यांच्या मते, "भाजपाच्या नेतृत्वातील सरकारनं महाराष्ट्राच्या हिताकडं दुर्लक्ष केल्याची मतदारांची धारणा आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची युती झाली. महाराष्ट्रात सत्तेसाठी काहीही करण्याची भाजपाची वृत्ती यातून दिसून आली. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्याबाहेर गेली. अनेक उद्योग गुजरातला पळवण्यात आले. त्यामुळे गुजरातच्या विकासाला चालना मिळाली."

राष्ट्रवादी सपाच्या कार्यालयातून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार : टीएस सिंगदेव म्हणाले की, "मी पुणे परिसरातील राष्ट्रवादी-सपा कार्यालयातून काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचं काम सुरू असल्याचं पाहिलं. आगामी काळात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे उबाठा नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात प्रचार करण्याची शक्यता आहे." आदित्य ठाकरे यांच्या विरोधात नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलेले नेते मिलिंद देवरा यांचा सामना रंगणार आहे.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदींचं महाविकास आघाडीला थेट आव्हान; म्हणाले, "राहुल गांधी यांच्या तोंडून..."
  2. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला! पंतप्रधान गृहमंत्र्यांसह लोकसभेचे विरोधी पक्षनेते आज घेणार प्रचारसभा
  3. "...त्यासाठीच धर्माचं राजकारण", 'मविआ'च्या प्रचार सभांमधून सचिन पायलट यांचा 'महायुती'वर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.