ETV Bharat / bharat

सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिल्यानं काँग्रेस आक्रमक, राज्यव्यापी आंदोलन करणार - Karnataka MUDA Case

Karnataka MUDA Scam : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुडा जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. आता याप्रकरणी काँग्रेसनं नाराजी व्यक्त करत संपूर्ण कर्नाटकमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

Karnataka MUDA Scam
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 10:23 PM IST

कर्नाटक Karnataka MUDA Scam : कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर मुडा जमीन घोटाळा प्रकरणी विरोधकांकडून सातत्यानं आरोप होत आहेत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. थावरचंद गेहलोत यांनी दिलेल्या परवानगीविरोधात आता काँग्रेसनं उद्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे मुख्यमंत्र्यांच्या वतीनं याचिका दाखल करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेणार : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी म्हैसूर नागरी विकास प्राधिकरणातील कथित जागा वाटप घोटाळ्याप्रकरणी खटला चालवण्यास परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 22 ऑगस्ट रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. विधानसभेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक होणार आहे. ही बैठक मुडा घोटाळ्याशी घडामोडीशी संबंधित आहे. या प्रकरणातील वस्तुस्थिती मुख्यमंत्री काँग्रेस आमदारांना कळवणार आहेत. काँग्रेसकडून कायदेशीर आणि राजकीय पद्धतीनं खटला लढण्याची रणनीती तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

  • काँग्रेस उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार : राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुडा मधील जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिल्याच्या विरोधात काँग्रेस उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांची प्रतिक्रिया : यासंदर्भात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले, "राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये निषेध रॅली काढण्यात येणार आहेत. त्यात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी होतील." सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यपाल विनाकारण हे प्रकरण समोर आणत असल्याचा आरोप केला. "ही लोकशाहीची हत्या असून काँग्रेस याला विरोध करेल." असं डीके शिवकुमार म्हणाले होते.

भाजपाही आंदोलन करणार : राज्यपालांच्या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी भाजपाचे आमदार उद्या विधानसौधा येथील गांधी पुतळ्यासमोर निदर्शनं करणार आहेत. भाजपा आमदार उद्या सकाळी 11.30 वाजता विधानसौध येथील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा

  1. "आयएएसचे खासगीकरण ही आरक्षण...", यूपीएससीमधील लॅटरल एन्ट्रीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - upsc recruitment 2024
  2. केंद्रानं घेतली डॉक्टर संघटना संपाची दखल; कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल प्रत्येक दोन तासाला द्या - गृह मंत्रालय - Kolkata Doctor Rape Murder Case
  3. बांगलादेशच्या प्रमुखांचा पंतप्रधान मोदींना फोन; हिंदूंच्या सुरक्षेचं आश्वासन - Muhammad Yunus Called PM Modi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.