नवी दिल्ली Jaya Bachchan : बॉलीवूडची ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन नेहमीच आपल्या रागामुळं चर्चेत असतात. त्या अनेकदा पापाराझींना फटकारताना दिसतात. तसंच त्या अनेकदा पापाराझींसाठी पोज देणं टाळतात. पापाराझींवर राग काढताना त्यांचे काही ना काही व्हिडिओ समोर कायम येतात.
जया बच्चन कायम चर्चेत : अभिनेत्री जया बच्चन अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. त्यांची काही विधानं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसंच संसदेत सध्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. त्यावेळी बोलताना जया बच्चन यांचा संताप दिसून आला. खासदार जया बच्चन यांना 'जया अमिताभ बच्चन' म्हटल्यावर त्यांना राग आला. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी त्यांना 'जया अमिताभ बच्चन' म्हटलं, तेव्हा त्यांनी या मुद्द्यावर जोरदार आक्षेप घेतला.
उपसभापतींवर का जया संतापल्या? : राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी सभागृहात जया बच्चन यांना 'मिसेस जया अमिताभ बच्चन' असं संबोधलं. यावर जया बच्चन सभागृहात उपसभापतींवर भडकल्या. तुम्ही जया बच्चन म्हटलं असंत तर, तर पुरे झालं असंत असं त्या उपसभापतींना म्हणाल्या. महिलांची स्वतःची ओळख आहे, याची आठवण त्यांनी सर्व खासदारांना करून दिली. यावेळी त्यांनी खासदारांना महिलांना ओळख नाही का? असा प्रतिप्रश्न केला.
महिलांचं काहीच अस्तित्व नाही का? : जया बच्चन यांनी आक्षेप घेतल्यावर उपसभापतींनी त्यांना आठवण करून दिली, की रेकॉर्डवरील त्यांचं पूर्ण नाव 'जया अमिताभ बच्चन'च असंच आहे. मात्र, त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली. 'आता एक नवीन ट्रेंड उदयास येत आहे, महिलांना त्यांच्या पतीच्या नावानं ओळखले जातय. महिलांचं काहीच अस्तित्वात नाहीत का? असा खडा सवाल जया बच्चन यांनी केला.
'हे' वाचलंत का :
- "मोदी जो निर्णय घेतील..."; मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट - Uddhav Thackeray Stance
- अजित पवारांच्या वेशांतरावरुन तापलं राजकारण; वेशांतर करुन तब्बल दहा वेळा दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, विरोधक आक्रमक - Ajit Pawar Disguise Controversy
- "मुख्यमंत्री शिंदे मौलवीच्या वेशात दिल्लीला जाऊन...", वेषांतराच्या मुद्द्यावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल - Sanjay Raut Criticism