बंगळुरू (कर्नाटक) Mother Murder Case : हत्येनंतर आरोपी केआर पुरा स्टेशन पोलिसांना शरण आला. (Son arrested) केआर पुरा येथील न्यायमूर्ती भीमैया लेआउटमध्ये राहणाऱ्या नेत्रावती (४०) यांची हत्या करण्यात आली होती. 17 वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आई आणि मुलात शाब्दिक बाचाबाची : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील मुळाबगीलू येथे डिप्लोमाचं शिक्षण घेणारा आरोपी मुलगा गुरुवारी घरी आला होता. रात्री आई आणि मुलामध्ये भांडण झालं होतं. तो रागावल्यानंतर न जेवता झोपी गेला. शुक्रवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी तयार झाला. सकाळी 7.30 वाजता त्याची आई नाष्टा न करताच झोपल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याला या गोष्टीचा फार राग आला. तिनं नाष्टा का बनवला नाही, असं त्यानं विचारलं. तेव्हा रागाच्या भरात असलेल्या नेत्रावतींनीही त्याला खडसावलं. यावरून दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली.
आईवर केला जीवघेणा हल्ला : यावेळी संतापलेल्या मुलानं नेत्रावती यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान, प्रचंड रक्तस्त्राव झाल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुलानं पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. गेल्या 30 वर्षांपासून नेत्रावती यांचं कुटुंब केआर पुरा येथे राहत होते. महिला भाड्याच्या घरात राहायची आणि कामाला जायची. मुलगा मुळबगीलू येथे शिकत होता. कारण ते मूळचे तिथलेच आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
डीसीपीची प्रतिक्रिया : "आज सकाळी ७ ते ८ च्या सुमारास खून झाला. नेत्रावतीला तिच्याच मुलानं जीवघेणा हल्ला करून ठार केलं. विधीसंघर्षग्रस्त बालक हा मुळाबगीलू येथे डिप्लोमाचं शिक्षण घेत होता. त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची चौकशी केली जात आहे,'' असं डीसीपी शिवकुमार यांनी सांगितलं.
हेही वाचा: