रायपूर Astrologer Became Killer : ज्योतिष्यानं तरुणाचा खून करुन त्याचा मृतदेह कार्यालयाखाली पुरुन दृष्यम चित्रपटाच्या कथानकाला सत्यात उतरवलं. मात्र तब्बल 5 महिन्यानंतर या घटनेला वाचा फुटल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना छत्तीसगडमधील महासमुंद इथं घडली आहे. बिरकोनी इथला यूपेश चंद्राकर हा तरुण 14 डिसेंबर 2023 पासून बेपत्ता होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. या प्रकरणात मुकुंद त्रिपाठी या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यूपेशचा मृतदेह बाहेर काढला. यूपेशचा प्रेमसंबंधातून खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
माझा भाऊ यूपेश हा बेपत्ता होता. संध्याकाळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्याच्या कपड्यांवरुन आणि केसांवरुन मी त्याचा मृतदेह ओळखला. तो बिरकोनी इथं राहत होता. 20 नोव्हेंबर 2023 रोजी महासमुंदमध्ये तो राहण्यास गेला होता. आरोपी मुकुंद त्रिपाठीसोबत भावाची ओळख कशी झाली हे कळू शकलेलं नाही. - मनीष चंद्राकर, मृताचा भाऊ
दृष्यम चित्रपटासारखाच पुरला मृतदेह : यूपेश चंद्राकर हा बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी 14 डिसेंबर 2023 ला दिली होती. त्याच्या कुटुंबीयांसह पोलीसही त्याचा कसून शोध घेत होते. यूपेश चंद्राकर याच्या बेपत्ता होण्याबाबतची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी मुकुंद त्रिपाठी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली. मात्र त्यानं यूपेश चंद्राकर याच्याबाबात काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन वाचारपूस केली असता, त्यानं तोंड उघडलं. यूपेशचा मृतदेह ज्योतिष्य मुकुंद त्रिपाठी यानं त्याच्या कार्यालयाखाली पुरल्याचं उघड झालं.
यूपेश चंद्राकर आणि मुकुंद त्रिपाठी यांच्यात वाद सुरू होता. या वादातून आरोपींनी यूपेशचा खून केला. प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून खून झाल्याचं दिसते. आरोपींची चौकशी सुरू आहे. - मोनिका श्याम, शहर पोलीस निरीक्षक महासमुंद
पोलिसांनी कुजलेला मृतदेह घेतला ताब्यात : ज्योतिष्य मुकुंद त्रिपाठी यानं यूपेश चंद्राकरचा खून करुन मृतदेह लोहानी इमारतीतील त्याच्या कार्यालयाच्या खाली जमिनीत 5 फूट खोल खड्डा केला. या खड्ड्यात यूपेशचा मृतदेह पुरल्याची त्यानं कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी कार्यालयाखाली खोदलं असता, संपूर्ण कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलिसांनी कुजलेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
प्रेमससंबंधातून खून केल्याचं झालं उघडं : यूपेश चंद्राकर हा त्याच्या बिरकोनी या गावात शेती करत होता. त्याची पत्नी ज्योती चंद्राकर या शिक्षिका आहेत. पत्नीच्या नोकरीमुळे यूपेश हा बिरकोनी या गावातून महासमुंद इथं ज्योतिष्य मुकुंद त्रिपाठी याच्या घराशेजारी क्लबपारा इथं राहण्यासाठी आला होता. मुकुंद त्रिपाठी याचं लोहानी इमारतीत कार्यालय आहे. त्याच्या पत्नीसोबत यूपेशचे प्रेमसंबंध असल्याचा संशय मुकुंद त्रिपाठी याला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- वकिलाने मुलाच्या मदतीने पक्षकार मित्राची केली हत्या, आरोपींना अटक - lawyer killed friend
- लैला खान हत्याकांड; लैला खान आणि इतर भावंडांचा डीएनए केवळ आईशी जुळला, अद्याप बाप नाही कळला, सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार - Laila Khan Murder Case
- छत्तीसगडमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या; घटनेनंतर आरोपीनंही केली आत्महत्या - Killing Five People in Sarangarh