ETV Bharat / bharat

महाराणा प्रताप जयंतीच्या दोन तारखा का आहेत, जाणून घ्या मेवाडच्या शूर योद्ध्याबाबतची रंजक कहाणी - Maharana Pratap Jayanti 2024

Maharana Pratap Jayanti 2024 : आज 9 मे रोजी महाराणा प्रताप यांची जयंती साजरी केली जात आहे. या विशेष दिवशी आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

Maharana Pratap Jayanti 2024
महाराणा प्रताप जयंती ((ETV Bharat file photo))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 12:09 PM IST

मुंबई - Maharana Pratap Jayanti 2024 : महाराणा प्रताप यांना मेवाडचा सिंह देखील म्हटले जाते. मेवाडचे राणा उदय सिंह आणि राणी जयवंताबाई यांचा मुलगा महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी राजस्थानमधील चित्तौडगड येथे झाला होता. त्याचं जन्म नाव हे अजबदे ​पुनवार होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे रोजी देशभरात साजरी करण्यात येणार आहे. हा दिवस फक्त राजस्थानमध्ये नाही तर संपूर्ण देशासाठी खूप विशेष आहे. महाराणा प्रताप हे त्यांच्या शौर्य आणि धैर्यासाठी जगप्रसिद्ध आहेत. भारताच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध राजपूत योद्ध्यांपैकी एक असलेले महाराणा प्रताप यांनी 16व्या शतकातील मुघल सम्राट अकबराच्या विरोधात अनेक युद्धं लढले आहेत.

महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा : लहानपणापासूनच महाराणा प्रताप शूर, युद्ध कलेत पारंगत असून खूप धार्मिक होते. त्याचा स्वाभाव खूप दयाळू असल्यानं लोक त्यांना मानवतेचे पुजारी म्हणायचे. त्यांचा सर्वात आवडता घोडा हा चेतक होता. त्यांना अमर सिंह आणि भगवान दास अशी दोन मुले होती. 1572 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर राणा प्रतापनं मेवाडची गादी स्वीकारली. जेव्हा मुघल राज्यकर्त्यांचे अत्याचार वाढले, तेव्हा महाराणा प्रताप हे एकमेव राजपूत शासक होते, ज्यांनी त्याच्या विरोधात तलवार उभी केली होती. त्यांनी आपल्या मूठभर सैनिकांच्या मदतीनं हजारो शस्त्रास्त्रांसह मुघल सैन्याला पळून जाण्यास भाग पाडलं होतं. दरम्यान महाराणा प्रताप यांच्याकडे 81 किलो वजनाचा भाला आणि चेतकसारखा एक निष्ठावान घोडा होता. याद्वारे त्यांनी अनेक लढ्या जिंकल्या.

महाराणा प्रताप यांचा मृत्यू : 18 जून 1576 रोजी हल्दी घाटीची लढाईमध्ये महाराणा प्रताप यांना अफगाण राजांचा पाठिंबा मिळाला होता. अफगाण हकीम खान सूर शेवटच्या श्वासापर्यंत रणांगणात लढत राहिले. या युद्धात महाराणा यांचा आवडता घोडा चेतक जखमी झाला. चेतकनं 25 फूट नाला ओलांडत उडी मारली होती, यानंतर तो गंभीर जखमी झाला होता. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. महाराणा प्रताप यांनी मुघलांच्या विरोधात अनेक लढ्या जिंकल्या आहेत, मात्र अनेक वर्षांच्या अथक संघर्षानंतर 29 जानेवारी 1597 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान महाराणा प्रताप यांची जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार राणा प्रताप यांचा जन्म ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला झाला होता. दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला महाराणा प्रताप जयंती देशभरात साजरी केली जाते. याशिवाय दुसरीकडे, इंग्रजी कॅलेंडरनुसार, प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला. त्यामुळेच त्यांची जयंती वर्षातून दोनदा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

हेही वाचा :

  1. जागतिक थॅलेसेमिया दिवसाचा इतिहास आणि महत्त्व घ्या जाणून ... - world thalassemia day 2024
  2. जागतिक रेडक्रॉस दिवस का आहे इतका महत्वाचा, घ्या जाणून - WORLD RED CROSS DAY 2024
  3. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2024 : सांस्कृतिक चळवळीला चालना देणारा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्व - International Dance Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.