ETV Bharat / bharat

एक्झिट पोल प्रकाशित करण्यावर बंदी; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय - Lok Sabha Elections - LOK SABHA ELECTIONS

Lok Sabha Elections : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांचा मौसम सुरू आहे. कोण बाजी मारणार किंवा कोणाला किती जागा मिळणार, यासाठी विविध संस्था सर्वे करत असतात. तसंच विविध पोल देखील टीव्हीवर प्रसारित केले जातात. यावर निवडणूक (Exit Polls Ban) आयोगानं मोठा निर्णय घेतलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 8:28 AM IST

नवी दिल्ली Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगानं शुक्रवारी अधिसूचना जारी केलीय. या अधिसूचनेनुसार, 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6.30 या वेळेत एक्झिट पोल आयोजित करणे, प्रकाशित करणे किंवा प्रचार करणे यावर बंदी (Exit Polls Ban) घालण्यात आलीय. याबरोबरच इतरही अनेक निर्बंध निवडणूक आयोगानं घालून दिले आहेत.

एक्झिट पोलवर बंदी : निवडणूक आयोगानं एक अधिसूचना जारी केलीय, ज्यामध्ये 19 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 दरम्यान एक्झिट पोल आयोजित करणे, प्रकाशित करणे किंवा प्रसिद्ध करणे यावर बंदी घालण्यात आलीय. याच काळात लोकसभेशिवाय चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळं या पोलचा परिणाम इतर निवडणुकांवर पडू नये यासाठी खबरदारी म्हणून निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतलाय.

निवडणूक सर्वेक्षण दाखवण्यास मनाई : गुरुवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत असंही स्पष्ट करण्यात आलंय की, लोकप्रतिनिधी कायद्याच्या तरतुदींनुसार, मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या 48 तासांच्या कालावधीत कोणत्याही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणतेही जनमत सर्वेक्षण किंवा इतर कोणतंही निवडणूक सर्वेक्षण दाखवणं प्रतिबंधित केलंय. त्यामुळं निवडणुकीचं कव्हरेज करताना आता माध्यमांना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा -

  1. रामटेकमध्ये काँग्रेसची टाईट; कोण देणार फाईट? 'वंचित'मुळं महाविकास आघाडीच्याही डोक्याला शॉट - Ramtek Lok Sabha elections
  2. अमरावतीत बच्चू कडूंचा नवनीत राणांवर ‘प्रहार’, ठाकरे गटाच्या 'या' नेत्याला दिली उमेदवारी - Amravati Lok Sabha Election
  3. गोविंदाला करायचा होता ठाकरे गटात प्रवेश; 'या' नेत्याचा मोठा खुलासा - GOVINDA JOINS SHIVSENA

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.