मुंबई- संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अत्यंत हिणकस वक्तव्य केलंय, असं म्हणत आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या अमित शाह यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलीय. त्यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते. या वक्तव्यातून भाजपाची मनोविकृत वृत्ती समोर आली असून, अशा मनोवृत्तीमुळेच आंबेडकरांना धर्मांतर करावे लागले, असे ठाकरे म्हणालेत.
कोश्यारी यांनी फुले अन् महाराजांचा अपमान केला : भाजपाच्या नेत्यांनी महामानवांचा सातत्याने अपमान केलाय. राज्याचे तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. आम्ही त्यांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढला होता, मात्र भाजपाने त्यांचा राजीनामा घेतला नाही किंवा त्यांना माफी मागायला देखील लावली नाही, असे ठाकरे म्हणालेत. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार केला, पुतळा आठ महिन्यांत कोसळला, मात्र पुढे काहीही झाले नाही. भाजपा आता आंबेडकरांचे नाव पुसायला लागलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आंबेडकरांबाबतचे वक्तव्य अत्यंत उर्मटपणाचे आहे. ज्यांनी देशाला संविधान दिले, त्या महामानवाचा अपमान शाह यांनी केलाय, असंही ठाकरे म्हणालेत.
भाजपाच्या भोंग्यावरचा बुरखा पूर्णपणे फाटलाय : तसेच आंबेडकर, आंबेडकर करणे ही फॅशन झालीय, असं वक्तव्य शाहांनी केलंय. त्यांचे हे वक्तव्य अत्यंत हिणकस आहे. भाजपाच्या भोंग्यावरचा बुरखा पूर्णपणे फाटलाय. भाजपासोबत असलेल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना शाह यांचे हे वक्तव्य मान्य आहे का, याचे उत्तर त्यांनी देण्याची गरज आहे, असंही ठाकरे म्हणालेत. आंबेडकर, आंबेडकर करून स्वर्ग मिळेल का, असे शाह म्हणाले, मात्र, मोदी मोदी करून भाजपाला स्वर्ग मिळेल का? असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला. शाह यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचे ढोंग उघड झाले. संविधान बदलायचे आहे, असे आम्ही सांगत होतो, संविधानावर चर्चा करताना अमित शाह उद्दामपणाने आणि तुच्छतेने कसे बोलू शकतात, याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे. शाह यांच्या तोंडातून भाजपाने आणि संघाने हे वक्तव्य केलंय का, याबाबत खुलासा करण्याची गरज आहे.
शाहांची भूमिका मित्रपक्षांना मान्य आहे का?: भाजपासोबत असलेल्या राजकीय पक्षांना शाह यांची ही भूमिका मान्य आहे का? याचे उत्तर देण्याचे आवाहन त्यांनी केलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले या प्रश्नावर राजीनामा देणार आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे, असे ठाकरे म्हणालेत. असे वक्तव्य करणाऱ्या अमित शाह यांच्यावर कारवाई करावी अन्यथा नरेंद्र मोदींनी सत्तेवर राहू नये. भाजपासोबत असणारे नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, अजित पवार, एकनाथ शिंदे यांना शाह यांची ही भूमिका मान्य आहे का? याचा खुलासा त्यांनी करण्याची गरज असल्याचं मत ठाकरे यांनी मांडलंय. महाराष्ट्रात त्यांना राक्षसी बहुमत मिळाले आहे, त्यामुळे महाराष्ट्रासोबत कसेही वागा, महामानवाबद्दल काहीही बोला, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र त्यांची मस्ती तोडण्याची वेळ आलीय. आंबेडकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का हे जनतेने भाजपाच्या आमदारांना विचारावे. आंबेडकरांचे नाव पुसायचा त्यांचा प्रयत्न आहे. असा प्रयत्न करणारे पुसले जातील, मात्र आंबेडकरांचे नाव पुसले जाणार नाही, असे ठाकरे म्हणालेत. भाजपा आणि संघाने सांगितल्याशिवाय ते असे बोलणार नाहीत, असा दावाही त्यांनी केलाय.
हेही वाचा
बाबासाहेबांबाबत हिणकस वक्तव्य करणाऱ्या अमित शाहांचा मोदींनी राजीनामा घ्यावा, उद्धव ठाकरेंची मागणी - UDDHAV THACKERAY
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आंबेडकरांबाबतचे वक्तव्य अत्यंत उर्मटपणाचे आहे. ज्यांनी देशाला संविधान दिले त्या महामानवाचा अपमान शाह यांनी केला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.
Published : 3 hours ago