नवी दिल्ली Jaishankar Speaks To Kuwaiti Foreign Minister : कुवेतमध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे 40 भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कुवेतचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांच्याशी चर्चा केली. आगीत प्राण गमावलेल्यांचे मृतदेह लवकरात लवकर मायदेशी (भारतात) पाठवावे, अशी विनंती त्यांनी कुवेतच्या परराष्ट्रमंत्र्यांना केली आहे. तसंच या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असं आश्वासनंही एस जयशंकर यांनी केलंय.
एस. जयशंकर यांनी एक्सवरील पोस्टमध्ये सांगितलं की, कुवेतमधील आगीच्या दुर्घटनेवर कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांच्याशी चर्चा केली. या संदर्भात कुवेती प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, कुवेतच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिलंय. तसंच घटनेत प्राण गमावलेल्यांचे मृतदेह लवकरात लवकर मायदेशी पाठवण्याची विनंती केल्याचंही एस जयशंकर यांनी सांगितलं. पुढं ते म्हणाले की, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह गुरुवारी कुवेतला पोहोचणार आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.
मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची मदत : कुवेतमधील आगीच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बुधवारी (12 जून) राष्ट्रीय राजधानीत बैठक घेतली. अपघातातील मृतांची ओळख पटली. जखमींवर आवश्यक ते उपचार करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. तर भारतीय दूतावासानं भारतीय कामगारांचा समावेश असलेल्या दुःखद आगीच्या घटनेसंदर्भात आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक +965-65505246 देखील जारी केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली.
हेही वाचा -