ETV Bharat / bharat

दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण, सैन्यदलाकडून शोधमोहिम सुरू - JAMMU KASHMIR NEWS

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी सैन्यदलाच्या एका जवानाचे अपहरण केले. त्यामधील एका जवानानं कशीबशी सुटका करून घेतली. तर दुसरा जवान अद्याप दहशतवाद्यांच्या ताब्यात आहे.

Jammu Kashmir news
दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण (Source- ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 9, 2024, 10:10 AM IST

अनंतनाग (जम्मू आणि काश्मीर): जम्मू आणि काश्मीरमधील खोऱ्यातून दहशतवाद्यांचा बिमोड करण्याकरिता पोलीस आणि सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणत मोहीम सुरू आहे. या मोहिमेला धक्का बसला आहे. अनंतनागमध्ये सैन्याच्या (टीए) दोन जवानांचे दहशतवाद्यांनी अपहरण केल्याची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली.

दहशतवाद्यांच्या तावडीतून एका जवानानं सुटका केली. मात्र, जवान जखमी झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनागमधील जंगल परिसरातून दोन जवानांचे अपहरण करण्यात आलं होते. त्यामधील एक जवान यशस्वीरित्या सुटका करून परतला. दुसऱ्या जवानाला शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केल्याची माहिती सूत्रानं दिली.

जवान रुग्णालयात दाखल- सूत्रानं सांगितलं की, "अपहरण केलेल्या टीए जवानाचे नाव हिलाल अहमद भट आहे. तो 162 युनिट टीएचा जवान आहे. तो अनंतनाग जिल्ह्यातील मुकदमपोरा नौगाम येथील रहिवासी आहे. तर फयाज अहमद शेख नावाचा दुसरा जवान दहशतवाद्यांच्या तावडीतून परतला आहे. पण त्याच्या खांद्याला आणि डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे."

घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकाला अटक- आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी एका 31 वर्षीय पाकिस्तानी घुसखोराला अटक केली. ही माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी आज दिली. घुसखोरी करणारा आरोपी हा पाकिस्तानच्या पंजाबमधील सरगोधा येथील रहिवासी आहे. त्यानं मंगळवारी संध्याकाळी सीमेपलीकडून घुसखोरी केली. त्याला मकवाल येथून ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. इम्रानच्या ताब्यातून दोन चाकू, प्रत्येकी एक स्मार्ट घड्याळ, सिगारेटचे पाकीट, एक रिकामे सिमकार्ड धारक आणि पाकिस्तानी चलनाचे 5 रुपयांचे नाणे जप्त करण्यात आले आहे. चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्याची माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक चौकशीनंतर पुढील आवश्यक कारवाईसाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये बदलले राजकीय चित्र- 8 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. 10 वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सनं (NC) 48 जागांवर विजय मिळवून बहुमताता आकडा पार केला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल कॉन्फरन्सनं 42 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी काँग्रेसला सहा जागा जिंकण्यात यश आले. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्याकरिता बहुमताचा आकडा 46 होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.