रांची ED Raid in Ranchi - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ईडीनं रांचीमध्ये मोठी कारवाई केली. काँग्रेस नेते तथा झारखंड सरकारमधील मंत्री आलमगीर आलम यांच्या पीए आणि नोकराच्या घरातून ईडीनं 25 कोटी रुपये जप्त केले आहेत. हे पैसे मंत्र्यांचे पीए संजीव यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
झारखंडची राजधानी असेलल्या रांचीत ईडीची मोठी कारवाई सुरू आहे. मंत्री आलमगीर आलम यांच्या पीए आणि त्यांच्या नोकराच्या घरी ईडीनं छापे टाकले आहेत. ईडीनं छाप्यात मोठी रक्कम जप्त केली आहे. ईडीनं आज सकाळपासूनच रांचीमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
कारवाईत ईडीचे 16 अधिकारी सहभागी- ईडीने धुर्वा, रांची येथील सेल सिटी, बोडिया रोडिवर काही ठिकाणी छापे टाकले आहेत. निलंबित असलेल्या मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित प्रकरणात ईडीनं कारवाई करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ईडीनं वीरेंद्र के. राम यांना फेब्रुवारी 2023 मध्ये मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अटक केली होती. ईडीनं वीरेंद्र कुमार राम यांचे पिता गेंदा राम यांच्या नावानं असलेले छतरपूर येथे फार्म हाऊस आणि दिल्लीमधील आलिशान जप्त केलं. या संपत्तीचं एकूण मुल्य 30 कोटी रुपयांहून अधिक आहे. ईडीच्या छापेमारीत 16 अधिकारी सहभागी झाले. संजीव लाल यांच्या घरावरही छापे टाकण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रांची येथील सेल सिटी येथील रस्ते बांधकाम विभागाचे अभियंता विकास कुमार यांच्या घरावरही छापा टाकण्यात येत आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेससह झामुमोवर साधला निशाणा-झारखंड भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चावर निशाणा साधला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, " गरीब, दलित, आदिवासी, मागासवर्गीयांच्या हक्कांवर गदा आणण्यात येत आहे. लुटलेल्या पैशातून काँग्रेस आपल्या राजपुत्राला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न पाहत आहे. ईडी आणि सीबीआयच्या गैरवापराची तक्रार करणारी झामुमो-काँग्रेस लोकांसमोर कोणते नवीन कारण सांगणार आहे? धीरज साहू ते आलमगीर आलम आणि पंकज मिश्रा ते पूजा सिंघल प्रचंड काळा पैसा जप्त करण्यात आला आहे. त्यावरून गेल्या ५ वर्षांत राज्य सरकारने केलेली लूट सगळ्यांना माहित झाली आहे. झारखंडमध्ये एका मंत्र्याच्या पीए आणि नोकराकडं 25 कोटी रुपये रोख मिळू शकतात.
हेही वाचा-