ETV Bharat / bharat

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल - Pooja Khedkar - POOJA KHEDKAR

Pooja Khedkar : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लोकसेवा आयोगानं बनावट ओळख वापरून नागरी सेवा परीक्षा दिल्याबाबत खेडकर यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. यासोबतच UPSC नं पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Pooja Khedkar
पूजा खेडकर (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 4:37 PM IST

Updated : Jul 19, 2024, 5:34 PM IST

नवी दिल्ली Pooja Khedkar : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. UPSC नं (लोकसेवा आयोग) पोलिसांकडं तक्रार दाखल केली असून खेडकर यांनी नियमांनुसार परीक्षा दिली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी खोटी कागदपत्र देऊन आयोगाची फसवणूक केल्याचं म्हटलं आहे. खेडकर यांनी त्यांच्या वडिलांचं नाव, आईचं नाव त्यांचा फोटो/स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबर पत्ता देखील बदलल्याचं म्हटलं आहे.

परीक्षेचे नियम बसवले धाब्यावर : पूजा खेडकर तसंच त्यांच्या आई मनोरमा, वडील दिलीप खेडकर यांच्या गैरवर्तनाची सविस्तर सखोल चौकशी करण्यात येत आहे. पूजा खेडकर यांनी आपलं नाव, वडिलांचं तसंच आईचं नाव, त्यांची छायाचित्र/स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, पत्ता बदलून बनावट ओळख निर्माण केली. तसंच त्यांनी परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं तपासात समोर आलं आहे.

UPSC नं बजावली कारणे दाखवा नोटीस : पूजा खेडकर यांची फसवणूक उघडकीस आल्यानंतर, UPSC नं पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्यावरुद्ध कारवाई सुरू केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वानं या प्रकणात त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसंच खेडकर यांना भविष्यातील परीक्षा/निवड प्रक्रियेपासून बाजूला करण्यात आलं आहे.

'हे' वाचलंत का :

  1. पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनी होणार सील ; पिंपरी चिंचवड महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर - IAS Pooja Khedkar Controversy
  2. पूजा खेडकर यांना यूपीएससीचा दणका : खोटं प्रमाणपत्र प्रकरणी दाखल केला खटला, बजावली कारणं दाखवा नोटीस - UPSC Issue Notice To Pooja Khedkar
  3. पूजा खेडकर प्रकरणावर जिल्हाधिकारी सुहास दिवसे प्रथमच बोलले; म्हणाले... - IAS Pooja Khedkar

Last Updated : Jul 19, 2024, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.