हैदराबाद Daytime Sleep : मेंदूच्या विकासामध्ये झोप महत्त्वाची भूमिका बजावते. नियमित पॉवर नॅप घेणाऱ्या मुलांना गोष्टी चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. यामागील कारण असं की, मुलं प्रौढांप्रमाणे आठवणी साठवून ठेवत नाही. त्यामुळे त्यांचा मेंदू ताजंतवानं करण्यासाठी त्यांना वारंवार विश्रांतीची गरज असते. नुकत्याच झालेल्या एका संशोधातून असं दिसून आलं की, दिवसाची झोप प्रौंढांसाठी तितकीच महत्वाची आहे जितकी मुलांकरिता. त्यामुळे मुलांबरोबरच प्रौंढांनिही पावर नॅप घेणे गरजेचं आहे.
झोप घेणे आरोग्यदायी सवय : दिवसा नॅप घेणे ही एक आरोग्यदायी सवय आहे. कार्यपद्धती सुधारण्यासाठी काही कामाच्या ठिकणी रेस्ट रूम देखील सुरु करण्यात आल्या आहेत. आदल्या रात्री चांगली झोप लागली नसेल किंवा सकाळी थकल्यासारख जाणवत असेल त्यामुळे दिवसा झोपण्याची गरज भासणे सामान्य आहे. अलीकडेच झालेल्या एका अभ्यासात दिवसा झोपणे किंवा डुलकी घेतल्यामुळे सतर्कता वाढते तसंच स्मरणशक्ती सुधारते.
An afternoon nap is a
— James DiNicolantonio (@drjamesdinic) August 15, 2024
pencil sharpener for your mind.
If you’re feeling low energy, take
a 20 minute nap.
Your mood, energy & focus will 🚀.
Napping is a superpower. 🦸 🏃♂️
चिडचिड कमी : चंचल स्वभावाचे लोक दिवसा झोप घेतल्यानंतर शांत आणि कमी चिडचिड करतात. जेम्स डिनिकोलॅंटोनियो, डॉक्टर ऑफ फार्मसी आणि हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत संशोधक शास्त्रज्ञांच्या मते दुपारी 20 मिनिटांची झोप ही तुमच्या मेंदूसाठी एक पेन्सिल शार्पनर ठरू शकते. जर तुम्हाला निस्तेज वाटत असेल तर 20 मिनिटांची झोप तुमच्यासाठी एक सुपर पॉवर सारखी आहे.
आठवड्यातून अनेक वेळ डुलकी घेणाऱ्यांचा मेंदू दिवसभरात कधीही डुलकी न घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत 15 क्युबिक सेमी मोठा होतो. दिवसा डुलकी घेणे मोठ्या प्रमाणात मेंदूच्या आकाराशी संबंधित आहे. वयानुसार मेंदू आकुंचन पावू लागतो. त्यामुळे मेंदूचा आकार लहान झाल्यास अनेक आजार होण्याची शक्यता असते. ज्यांचा मेंदूचा आकार कमी त्यांच्यात तणावाचे हार्मोन कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात असतात.
- हृदयासाठी फायदेशीर : दिवसा झोप घेतल्यानं रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्यासाठी सुधारते. विशेषत: तणावपूर्ण घटनांपूर्वी डुलकी घेणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे रक्तदाब अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित होण्यास मदत होते.
- शरीर आणि मनाचा थकवा दूर करण्यासाठी पॉवर नॅप आवश्यक आहे.
- दिवसा झोपल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होते
- पॉवर नॅप घेतल्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते.
- कर्करोग, रक्तदाबाचा धोका पॉवर नॅपमुळे कमी होतो.
कधी घ्यावी डूलकी : सकाळी उठल्यानंतर 6 ते 8 तासांनी डुलकी घेणे चांगलं आहे. कारण यावेळी कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. कोर्टिसोल हार्मोन तुम्हाला सतर्क राहण्यास मदत करतो. दिवसा झोप घेतल्याने सर्जनशीलता वाढू शकते आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारू शकते.
- दिवसा झोप घेण्याबाबत खबरदारी
डुलकीचा कालावधी : काही लोकांसाठी 10-15 मिनिटांची डुलकी पुरेशी असू शकते, तर काहींना थोडी जास्त झोप घ्यावी लागेल. तथापि, 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपणे योग्य नाही. 30-40 मिनिटे डुलकी घेणे फायदेशीर आहे.
योग्य वेळ : दुपारी १ ते ३ या वेळेत डुलकी घेतल्यानं कामाचं कौशल्य सुधारतं. दुपारी ३ नंतर डुलकी घेणे टाळावे कारण त्याचा रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. जेवणानंतर लगेचच डुलकी घेणे टाळा.
निष्कर्ष : प्रौढांसाठी दिवसा डुलकी घेणे फायदेशीर आहे. परंतु आरोग्यविषयक फायदा मिळविण्यासाठी योग्य वेळेत आणि योग्य वेळी झोप घेणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीकरीता खालील वेबसाईटवर भेट द्या
https://www.sleephealthjournal.org/article/S2352-7218(23)00089-X/fulltext
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा