पाटणा Bihar Political Crisis : एकीकडं मुख्यमंत्री नितीशकुमार महागठबंधन सोबतची साथ सोडून भाजपासोबत सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. तोच दुसरीकडं त्यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रीय जनता दलाकडून (आरजेडी) प्रयत्न सुरू आहेत. आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या मुलीनं सोशल मीडियावरुन नितीश कुमारांवर निशाणा साधलाय. त्यांनी X वर (पुर्वीचं ट्विटर) एक पोस्ट करत म्हटलंय, "काहीही झालं तरी ते जातीयवादी शक्तींविरुद्ध लढत राहतील."
रोहिणी आचार्य यांनी काय लिहिलं : सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या आरजेडी अध्यक्ष लालू यादव यांच्या मुलीने X वर लिहिलं की, "आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही जातीय शक्तींविरुद्ध आमचा लढा सुरुच ठेवू." तसंच त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं की, "लाखो तरुणांच्या चेहऱ्यावर उमललेलं हास्य, ही तेजस्वीची ओळख आहे. ही ओळख मी पाहिली आहे."
नितीश विरोधात आरजेडीची रणनीती तयार : नितीश कुमारांच्या साथ सोडण्याच्या चर्चेदरम्यान, आरजेडीनंही आपले प्रयत्न सुरू केले आहेत. शनिवारी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली आरजेडीचे सर्व आमदार, विधानपरिषद आणि मोठ्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत तेजस्वी यांनी आपल्या नेत्यांना एकजूट राहण्याचं आवाहन केलं. तसंच यावेळी ते नितीश कुमार यांना सहजासहजी सत्ता बदलू देणार नसल्याचंही सांगितलं.
-
तेजस्वी की यही पहचान देखी है
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 28, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
लाखों युवाओं के चेहरे पे
जो खिली मुस्कान देखी है.. https://t.co/9fD8GcH67l
">तेजस्वी की यही पहचान देखी है
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 28, 2024
लाखों युवाओं के चेहरे पे
जो खिली मुस्कान देखी है.. https://t.co/9fD8GcH67lतेजस्वी की यही पहचान देखी है
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 28, 2024
लाखों युवाओं के चेहरे पे
जो खिली मुस्कान देखी है.. https://t.co/9fD8GcH67l
काय आहे बिहार विधानसभेचं गणित : 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत आरजेडी सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांचे 79 आमदार आहेत. आरजेडीकडे काँग्रेसचे 19, सीपीआय (एमएल) 12, सीपीआयचे 2 आणि सीपीआय (एम) चे 2 आमदार आहेत. ही संख्या 114 आहे. तर बदललेल्या परिस्थितीत नितीश कुमार यांना जेडीयू मधील 45 त्याव्यतिरिक्त 78 भाजप आमदार, 4 हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एक अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळू शकतो. एकूणच ही संख्या 128 वर पोहोचल्याचं दिसते. तर एमआयएमचा एक आमदार महाआघाडीसोबत जाऊ शकतो.
हेही वाचा :