Nalanda Cheating in Diploma Exam : बिहारमधील नालंदा सध्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळं सतत चर्चेत आहे. नीट पेपर लीक प्रकरणी नालंदा येथील सहा जणांना पोलिसांनी नुकतीच देवघर येथून अटक केली होती. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. नालंदा येथे झालेल्या आणखी एका परीक्षेत हेराफेरीचं वृत्त समोर आलंय. बिहार संयुक्त प्रवेश स्पर्धा मंडळातर्फे आयोजित डिप्लोमा-कम-प्रमाणपत्र प्रवेश स्पर्धा प्रवेश परीक्षा रविवारी नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ शहरातील 14 केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आलीय.
परीक्षेदरम्यान शहरातील दोन परीक्षा केंद्रांवरून एका मुन्नाभाईला आणि कॉपी करणाऱ्या 15 जणांना ताब्यात घेतलं आहेत. ही माहिती डीएसपींनी दिलीय. संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना डीएसपी नूरुल हक म्हणाले की, ''इस्लामपूर येथील सुभाष कुमार याला कागी मोहल्ला येथील सदर आलम मेमोरियल माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रातून राहुल कुमारच्या जागी परीक्षा देताना पकडण्यात आलं आहे. तर कचरी आरपीएस शाळेतील 15 जणांना कॉपी करताना पकडण्यात आलंय.''
पोलिसांकडुन चौकशी सुरू : अखिलेश प्रसाद, नितीश कुमार, मुन्ना कुमार, रणजीत कुमार, उपेंद्र कुमार, सौरव, सोनू, चंदन, रिशु राज, आदित्य कुमार, शिव शंकर प्रसाद, पप्पू कुमार, सृष्टी कुमारी, आरती राणी, शंकर कुमार यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या पोलिसांकडून सर्वांची चौकशी सुरू आहे.
या परीक्षा केंद्रांवर सुरू होत्या परीक्षा : बिहारशरीफ शहरातील कचरी आरपीएस स्कूल, डॅफोडिल पब्लिक स्कूल, सदर आलम मेमोरियल सेकंडरी स्कूल, बिहार टाऊन स्कूल, भैंसासूर रेसिडेंशियल मॉडेल मिडल स्कूल, शेखाना गव्हर्नमेंट गर्ल्स मिडल स्कूल, एसएस गर्ल्स स्कूल, जवाहर कन्या हायस्कूल, केंब्रिज स्कूल, पीएल. साहू स्कूल, सोगरा हायस्कूल आणि सरकारी गर्ल्स हायस्कूलमध्ये परीक्षा घेण्यात आली होती.
हेही वाचा
- पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणल्यानं होईल फायदा, किंमती 20 रुपयांनी होऊ शकतात कमी - GST On Petrol Diesel Price
- NEET-UG पेपर लीक प्रकरणात नवीन गुन्हा दाखल, CBI तपासासाठी पाटणा, गोध्राला जाणार - NEET UG Paper Leak Case
- नीट परीक्षेचा घोळ थांबेना : पेपर फुटीसह शिक्षण माफियांसमोर पंतप्रधान मोदी हतबल झालेत, विरोधकांचा हल्लाबोल - NEET PG Exam Postponed