ETV Bharat / bharat

देव दर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; टेम्पो ट्रॅव्हलरची ट्रकला भीषण धडक, 13 जण ठार, एक गंभीर - Haveri horrible Road Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 7:45 AM IST

Updated : Jun 28, 2024, 7:56 AM IST

Haveri horrible Road Accident : टेम्पो ट्रॅव्हलरनं ट्रकला मागून धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात 13 भाविकांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील गुंडेनहल्ली इथं आज पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

Haveri horrible Road Accident
घटनास्थळी मदत करताना पोलीस (ETV Bharat)

बंगळुरू Haveri horrible Road Accident : देव दर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. टेम्पो ट्रॅव्हलरनं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं तब्बल 13 भाविकांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना हावेरी जिल्ह्यातील ब्याडगी तालुक्यातील गुंडेनहल्ली इथ शुक्रवारी पहाटे घडली. या टेम्पो ट्रॅव्हलरमधील भाविक हे सावदट्टी इथं देवाच्या दर्शनाला गेले होते. मात्र देव दर्शनावरुन परत येताना हा भीषण अपघात घडला. अपघातातील मृत भाविक हे शिवमोग्गा इथले रहिवासी आहेत, अशी माहिती पोलीस दलातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

देव दर्शनावरुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला : शिवमोग्गा इथले भाविक टेम्पो ट्रॅव्हलरनं सावदट्टी इथं दर्शनाला गेले होते. यावेळी देव दर्शन करुन परत येताना टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचं गुंडेनहल्ली इथं नियंत्रण सुटल्यानं त्यानं ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला, तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत भाविक हे शिवमोग्गा इथले रहिवासी आहेत. आज पहाटे चार वाजताच्या सुमारास गुंडेनहल्ली क्रॉसजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच ब्याडगी पोलीस ठाण्यातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र यातील 13 भाविकांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

हेही वाचा :

  1. शिकाऊ चालकानं ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबल्यानं तिघांना उडवलं; कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू - Mumbai Accident News
  2. पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीची अखेर बालसुधारगृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाने दिले होते आदेश - Pune Porsche Accident Case
  3. सांगोल्याजवळ भीषण अपघात; आयशरची सात महिलांना धडक, पाच महिला शेतमजुरांचा मृत्यू - Accident In Solapur

Last Updated : Jun 28, 2024, 7:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.