VIDEO : ट्रकची स्कूटरला धडक; ११ वर्षाच्या मुलीचा मृत्यू तर दुसरी मुलगी जखमी - वांद्रे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - वांद्रे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे कला नगर सिग्नलजवळ झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर तिची बहीण जखमी झाली. मृत मुलीचे नाव झोया अन्सारी असून, ती 11 वर्षांची आहे. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झोया आपल्या वडील आणि बहिणीसोबत स्कूटरने धारावीहून अंधेरीकडे जात होती, कला नगर सिग्नलजवळ येताच मागून येणाऱ्या ट्रकने स्कूटरला धडक दिली, यात झोयाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात झोयाची बहीण जखमी झाली असून तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, घटनास्थळी पोहोचलेल्या खेरवाडी पोलिसांनी सांगितले की, आरोपी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे, घटनेच्या वेळी स्कूटरवर मात्र तीन जण होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST