Video : तारेचे कुंपण ओलांडण्यासाठी मोठ्या हत्तींनी केली लहान पिल्लाला मदत - कुप्पापलायम वन परिक्षेत्र
🎬 Watch Now: Feature Video
कोईम्बतूर ( तामिळनाडू ) : कुप्पापलायम वन परिक्षेत्रातील ( Kuppapalayam Forest Range ) हत्तींचा एक कळप शेतजमिनीत घुसला. ग्रामस्थांनी याबाबत नरसीपुरम वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन हत्तींना जंगलाकडे वळवले. परंतु, ते परमेश्वरनपालयम येथील आनंदनच्या शेतजमिनीत परतले. पाच हत्ती आनंदनच्या शेतातील विद्युत कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. 2 हत्तींनी कुंपण ओलांडले. इतर 2 हत्ती कुंपण पार करण्यासाठी सपाट करून लहान पिल्लाला मदत करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत ( Coimbatore Elephants Video goes Viral ) आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी या लहान पिल्लाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तारेच्या कुंपणात वीज नसल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ( Elephants helping Calf to cross Fence ) आहे.