MP Praful Patel : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज : खासदार प्रफुल्ल पटेल - Farmers affected by heavy rains
🎬 Watch Now: Feature Video
चंद्रपूर : अतिवृष्टीने नेस्तनाबूत झालेल्या ( Heavy rain in Chandrapur ) शेतकऱ्यांना तातडीने मदत ( Provide urgent help to farmers due to heavy rains ) दिली गेली पाहिजे, या मताचा मी आहे. राज्यात आमचे महाविकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi Govt ) असताना अशी मदत दिली गेली. यावेळीही ती दिली जाणार होती, पण सरकार गेले. आता नव्या सरकारला सत्तेत येऊन तीन महिने झाले. केवळ घोषणा केली, मात्र पैसे अजूनही दिलेले नाहीत. विदर्भातील काही जिल्ह्यात अतिशय गंभीर स्थिती ( situation is very critical in some districts of Vidarbha ) होती. संपूर्ण राज्यातच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने पैसे देऊन त्यांची मदत केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल ( Nationalist Congress leader MP Praful Patel ) यांनी केली. ते चंद्रपुरात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी आले होते.