XE Variant Maharashtra : नव्या व्हेरियंटबाबत महाराष्ट्राने सतर्क रहावे - डॉ. भारती पवार - एक्सईचे रुग्ण महाराष्ट्र
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत ( Corona new variant ) सतर्क राहण्याची गरज असून केंद्र सरकारने त्याबाबत इशारा दिल्याचे केंद्रिय राज्य मंत्री डाॅ. भारती पवार ( Union Minister of State Dr. Bharti Pawar ) यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ( Collector Office Nashik Review Meeting ) आढावा बैठकीनंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. काही राज्यात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. मिझरोम, केरळ आणि महाराष्ट्रात रुग्ण आढळून येत आहे. एक्सईचे रुग्ण ( XE Variant Patient ) आढळून आल्याने संशोधन सुरू असून लवकरच त्याबाबत सूचना येतील. कोरोनाचा धोका टळलेला नाही. काळजी घ्या. लसीकरणाचा मोठा फायदा भारताला झाला आहे, असेही यावेळी भारत पवार यांनी सांगितले.