Tej Pratap Yadav: तेजप्रताप यादव यांना मथुरा पोलिसांनी अडवले; व्हिडिओ करत तेजप्रताप यांची टीका - Leader of Opposition Tejashwi Yadav
🎬 Watch Now: Feature Video
पटना (बिहार) - राष्ट्रीय जनता दराचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव आणि हसनपूरचे आमदार तेज प्रताप यादव यांना मथुरा पोलिसांनी अर्धा तास पोलिसांनी अडवून ठेवले. ( Tej Pratap Yadav ) यावर तेजप्रताप यांनी एका व्हिडीओद्वारे योगी सरकारवर आरोप केले आहेत. तेजप्रताप सांगत आहेत की 20 वर्षात पहिल्यांदाच आपल्यासोबत हे घडले आहे. तेजप्रताप यांना मथुरेत सुमारे अर्धा तास पोलीस ठाण्यात अडकून ठेवले होते. ( RJD Leader Tej Pratap Yadav ) त्यांना गोवर्धन परिक्रमा करण्यापासूनही रोखण्यात आले. तेज प्रतापच्या म्हणण्यानुसार, ते आपल्या आजारी वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी देवाच्या दरबारात आले होते.
Last Updated : Jul 12, 2022, 9:55 PM IST