शिवसेना आमदाराचा राज्य सरकारला घरचा आहेर - tanaji swaqnt news
🎬 Watch Now: Feature Video
शिवसेनेचे आमदार आणि उपनेते तानाजी सावंत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्य सरकारने कितीही नाटकं केली, कितीही शो करायचा प्रयत्न केला तरी केंद्राच्या मदतीशिवाय राज्यातील एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे वक्तव्य तानाजी सावंतांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेवर सावंतांची नाराजी कायम असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार सावंत हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वीच सावंत यांनी मी नाराज नसल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. त्यातच आता सावंत यांनी हे वक्तव्य केल्याने सावंत सेनेला जय महाराष्ट्र करणार का? अशी चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. केंद्राच्या मदतीशिवाय राज्य सरकार काहीही करू शकत नाही असे वक्तव्य तानाजी सावंतांनी केल्याने शिवसेना आणि तानाजी सावंत यांच्यातला मंत्रिपदासाठीचा असलेला सुप्त संघर्ष पाहायला मिळाला आहे.