Cyrus Mistry Funeral : सायरस मिस्त्री अनंतात विलीन, अंबानी टाटांसह सुप्रिया सुळे अंत्यदर्शनाला उपस्थित - Supriya Sule Attends Funeral with Ambani Tatas
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16297452-thumbnail-3x2-llll.jpg)
मुंबई : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात ( Tata Sons chairman Cyrus Mistry Died in Accident ) मृत्यू ( Cyrus Mistry Family ) झाला. सोमवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी परदेशात असलेले सायरस मिस्त्री यांचे कुटुंबीय सोमवारी रात्री पुन्हा भारतात परतले अखेर आज वरळी येथील पारसी स्मशानभूमी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्री यांच्या अंत्यसंस्कारासाठी रतन टाटा यांची सावत्र आई सिमोन टाटा मुंबईतील वरळी स्मशानभूमीत पोहोचल्या. काँग्रेस नेते मिलिंद देवराही पोहोचले आहेत, तर अनिल अंबानी आणि सुप्रिया सुळेही स्मशानभूमीमध्ये येऊन त्यांच्या पार्थिवाचा अंतिम दर्शन घेतले. शोकसभा घेऊ नये, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.