Spicejet विमानाने उड्डाण करताच छतावरून पाणी लागले टपकायला, एअर होस्टेसने दिला टिश्यू पेपर, पहा व्हिडीओ - स्पाइस जेट कितना सेफ है
🎬 Watch Now: Feature Video
जबलपूर ( मध्यप्रदेश ) विमानाने उड्डाण करताच मुंबई जबलपूर स्पाईसजेट फ्लाइटमध्ये पाणी टपकायला लागले. यादरम्यान प्रवाशांनी एअर होस्टेसकडे तक्रार करून कॅप्टनला बोलावण्यास सांगितले. मात्र एअर होस्टेसने टिश्यू पेपर प्रवाशांच्या हातात दिला. स्पाईसजेटच्या या सेवेमुळे प्रवासी इतके नाराज झाले आहेत की, ते याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) तक्रार करणार आहेत. स्पाइस जेटच्या विमानातून प्रवास करणे प्रवाशांसाठी अडचणीचे ठरत आहे. कंपनीच्या विमानात दररोज तांत्रिक बिघाड होत आहे. बुधवारी पुन्हा एकदा मुंबई-जबलपूर स्पाईसजेटच्या फ्लाइटमधील त्रुटी समोर आल्या आहेत. विमानाच्या छतावरून पाणी टपकत होते, जे सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडत होते. यादरम्यान एका प्रवाशाने छतावरून पाणी टपकत असल्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेव्हा प्रवाशांनी एअर होस्टेसकडे पाणी पडत असल्याची तक्रार केली आणि कॅप्टनला फोन करण्यास सांगितले. तेव्हा एअर होस्टेसने कॅप्टनला फोन करण्यास साफ नकार दिला. त्यानंतर प्रवाशांना टिश्यू पेपर देऊन पाणी पुसण्याचा सल्ला देण्यात आला. नंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. spicejet plane roof leakage, mumbai jabalpur spicejet flight, spicejet flight emergency landing, spicejet viral video