Kolhapur Yuva Sena protest : वेदांता प्रकल्प गेल्याने युवावर्गाचे नुकसान, युवासेनेचे जोरदार निदर्शने करत स्वाक्षरी मोहीम - कोल्हापूर युवासेनेची स्वाक्षरी मोहीम
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर : वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले ( Vedanta Foxconn project issue ) आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात टीकेची जोड उठवली ( protest against Shinde Fadnavis government ) आहे. कोल्हापुरात शिंदे सरकार विरोधात युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात ( Kolhapur Yuva Sena protest ) आले.
युवासेनेची निषेध - स्वाक्षरी मोहीम वेदांत आणि फॉक्सकॉन चा महाराष्ट्रात येऊ घातलेला प्रकल्प हा शिंदे -भाजपा सरकारच्या हलगर्जीपणामुळे गुजरातमध्ये गेला. दीड लाख कोटीच्या आसपासची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प होता. यामुळे १ लाखाच्यावर तरुणांचा रोजगार जाऊन महाराष्ट्रातील युवा वर्गाचे फार मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत कोल्हापुरात शिंदे सरकार विरोधात युवासेनेतर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी गुजरात मध्ये गेलेला प्रकल्प पून्हा महाराष्ट्रात यावा यासाठी आज निषेध - स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली. असून यावेळी युवासेना यांच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला ( Signature campaign of Kolhapur Yuva Sena ) आहे. या सरकारला याचा तळतळाट लागणार असून आम्ही येथे स्वाक्षरी मोहीम राबवत असून गेलेला रोजगार परत मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत असे मंजिंत माने म्हणाले आहेत.
Last Updated : Sep 15, 2022, 8:43 PM IST