Balaji Kalyankar : नांदेडमध्ये बंडखोर आमदार बालाजी कल्याणकरांचे जंगी स्वागत; म्हणाले, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे... - बालाजी कल्याणकर यांचे नांदेडमध्ये आगमन
🎬 Watch Now: Feature Video
नांदेड - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा देखील सहभाग आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी शपत घेतल्यावर आज ( 8 जुलै ) नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचे नांदेडला आगमन झाले. शिंदे गटासोबत बंडखोरी केलेल्या आमदार बालाजी कल्याणकर यांचे नांदेडमध्ये मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रेल्वेस्थानकापासून समर्थकांनी आमदाराच्या घरापर्यंत भव्य रैली काढली. यावेळी आयटीआय परिसरात एक क्विंटल फुलांचा हार क्रेन द्वारे आमदारांच्या गळ्यात टाकून त्यांचे स्वागत करण्यात आलंय. मला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे पण जवळचे आहेत, असं वक्तव्य बालाजी कल्याणकर यांनी माध्यमांशी बोलताना ( mla balaji kalyankar reached nanded ) केलं.