Sanjay Shirsath to CM Uddhav Thackeray : आम्ही गद्दार नाही; काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून... - संजय शिरसाठांचा व्हिडिओ शिंदेंनी केला शेअर - eknath shinde share video
🎬 Watch Now: Feature Video
गुवाहाटी (आसाम) - आम्ही गद्दार नाही आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून बाहेर आलो आहोत. खुप वेळा आपल्याकडे निधीसाठी कामांसाठी वेळ मागितला. मात्र आपण प्रत्येक वेळी आम्हाला निधी बद्दल विचारू नका म्हणालात. आपले कालचे भाषण भावनिक होते. असे आमदार संजय शिरसाठ म्हणाले. शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदार संघाचे आमदार संजय शिरसाठ ( MLA Sanjay Shirsath ) यांनी आपल्या भावना व्यक्त करणारे पत्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Party chief Uddhav Thackeray ) यांना लिहिले होते. यामध्ये बंड करण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षातील काही लोकांकडून अवमानास्पद वागणूक दिली जात असून तुम्हाला भेटता येत नसल्याने मतदारांना काय तोंड दाखवायचे, असा प्रश्न संजय शिरसाठ यांनी पत्रातून मुख्यमंत्र्यांना उपस्थित केला आहे. त्यानंतर आता त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करुन पुन्हा आपले दुःख मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केले आहे. ( Sanjay Shirsath to CM Uddhav Thackeray ) दरम्यान एकनाथ शिंदे यांनी हा व्हिडिओ आपला ट्वीटरवर शेअर केला आहे.