Sharad Pawar on Cyrus Mistrys Death सायरस मिस्त्री यांचा अपघात धक्कादायक पद्धतीचा, हा अपघात काहीतरी शिकवतोय; शरद पवार - former chairman of tata sons cyrus mistry is dead

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 4, 2022, 8:22 PM IST

पुणे: उद्योजक आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं निधन Cyrus Mistrys accidental death झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा अपघात झाला असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या या अपघाती मृत्यूनंतर अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar on Cyrus Mistrys Death यांनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. सायरस मिस्त्री यांचा अपघात धक्कादायक पद्धतीचा हा अपघात काहीतरी शिकवतोय, Cyrus Mistrys accident teaches us something अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मिस्त्री नवीन पिढीचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व- यावेळी पवार म्हणाले की, देशाच्या आणि विशेषतः हा महाराष्ट्राच्या उभारणीसाठी पारशी समजातील अनेकांचं फार मोठं योगदान आहे. त्या योगदान देणाऱ्या लोकांच्या यादीत मिस्त्री ग्रुप हा अत्यंत महत्त्वाचं काम करणार ग्रुप आहे. यांनी सुरवातीला टाटांच्या समवेत खूप मोठं काम केलं. एक काळ असा होता की टाटांच्या ग्रुप मध्ये टाटा पेक्षा जास्त गुंतवणूक मिस्त्री ग्रुप ची होती. नंतर रतन टाटा यांनी आपल्या पदातून मुक्तीचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर टाटा ग्रुप च नेतृत्व सायरस मिस्त्री यांच्याकडे गेलं आणि ते अध्यक्ष झाले. अतिशय बारकाईने ते काम करत होते दुर्दैवाने त्यांच्यात काही मतभेद झालं आणि त्यांना तो ग्रुप सोडावं लागलं. असा असताना त्यांनी टाटा मधून राजीनामा दिला आणि ती आपल्या कामाला लागले. सायरस मिस्त्री हे अत्यंत सुस्वाभावी आणि कमीत कमी बोलणारे ग्रस्त होते. कुठेही कटुता असणार नाही याची काळजी ते नेहेमी घेत असत. मिस्त्री कुटुंबातील नवीन पिढीचे ते अत्यंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होते. त्यांचं निधन म्हणजे देशातील तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणात धक्कादायक बाब आहे. हा अपघात काहीतरी शिकवत आहे. चांगले रस्ते हे जमेचे बाजू आहे. पण चांगले रस्ते म्हणून गाडीच्या वेगावरच्य नियंत्रणा संबंधी कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे.अस यावेळी पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.