NCP Chief Sharad Pawar : सरकार कोसळल्यानंतर! भाजपासोबत जाणार का? शरद पवार म्हणाले, मी... - शरद पवार एकनाथ शिंदे सीएम न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली - एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये तळ ठोकल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. त्यातच आज राज्यातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी येथे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलावली आहे. मात्र राज्यातील घडामोडी पाहता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी स्पष्ट केल्या. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचा मुद्दा हा शिवसेनेचा अंतर्गत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर यावेळी पत्रकारांनी त्यांना आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपासोबत जाणार का? असा प्रश्न केला. यावेळी शरद पवारांनी उत्तर देत सांगितले की, राष्ट्रवादी विरोधात बसेल.