Raosaheb Danve Criticized Mahavikas Aghadi : रावसाहेब दानवेंची महाविकास आघाडीवर टीका; म्हणाले.... - Raosaheb Danve on rana couple
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद - महाराष्ट्रात आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. राणा दाम्पत्यांना अटक केली जाते. महाराष्ट्र पोलीस या वागणुकीने बदनाम होत आहे. राणांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणावी या मताचा मी नाही. मात्र, कुणीतरी त्यांची सरकारकडून समजूत काढायला हवी होती. पण, गुंडगिरी करून त्यांना अटक करणे योग्य नाही. राज्य सरकारने ही परिस्थिती बिघडवली आहे, अशी टीका दानवेंनी महाविकास आघाडीवर केली ( Raosaheb Danve Criticized Mahavikas Aghadi ) आहे.