VIDEO : नंदिनी नदी प्रदुषण रोखण्यासाठी लढा देणाऱ्या चंद्रकिशोरचे पंतप्रधानांनी केले कौतुक - नंदिनी नदी प्रदुषण रोखणारे चंद्रकिशोर पाटील
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांचे कौतुक केले. कुठलेही संस्थात्मक अथवा शासकीय पाठबळ नसताना ते पर्यावरण रक्षणाच्या तीव्र कळकळीतून शहरातील नंदीनी नदीच्या प्रदुषणाविरोधात एकाकी लढा देत आहेत. नवरात्रीदरम्यान जमा होणारे शेकडो टन निर्माल्य नंदीनी नदीत फेकले जाऊ नये, म्हणून दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत उंटवाडी पूलावर शिट्टी घेऊन उभे राहत जनजागृती करण्याचा शिरस्ता गेल्या सात वर्षांपासून ते पाळत आहेत. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.