Ganeshotsav 2022 Mumbai बाप्पाच्या आगमनासाठी मुंबईतील मंडळांची लगबग सुरू

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
मुंबई 31 ऑगस्टला बाप्पाचा आगमन होणार आहे. मात्र त्या आधीच मुंबई मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. गेली दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर गणेश उत्सव Ganeshotsav 2022 Mumbai साजरा करण्यासाठी संपूर्ण मुंबई सज्ज झाली आहे. सरकारने सर्व सार्वजनिक सण निर्बंध मुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच गणेश मूर्तींच्या उंचीवर देखील कोणतेही निर्बंध राहिले नाहीत. त्यानंतर मुंबईतील एक उपनगर आतले सर्व गणेश मंडळांनी उंच मूर्ती मंडळात आणण्याची लगबग सुरू केली आहे. खास करून मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दहा ते पंधरा दिवस आधी बाप्पाची उंच मूर्ती Ecofriendly Ganesh Idol Mumbai आपल्या मंडळाचा नेत असतात. आज गणेश मंडळाचा जल्लोष मुंबईच्या रस्त्यांवर पाहायला मिळाला. खास करून लालबाग, परळ, चिंचपोकळी या भागामध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या मूर्ती मंडळात नेण्याची तयारी सुरू केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.