पोलिसांनी बस्तरमधील नक्षलवाद्यांची शस्त्र पुरवठा साखळी तोडली; देशी शस्त्रास्त्रांवर काम सुरू - नक्षल दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे नियंत्रण सुटले
🎬 Watch Now: Feature Video
बस्तर (छत्तीसगड) - बस्तरच्या जंगलात नक्षल दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे नियंत्रण सुटत चालले आहे असा पोलिसांचा दावा आहे. ( Police Broke The Arms Supply Chain of Naxalites In Bastar ) स्फोटके, औषधे, तंबूचे साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू माओवाद्यांपर्यंत पोहोचू नयेत यासाठी बस्तर पोलीस विशेष मोहीम राबवत आहेत. यासाठी तेलंगणा, ओडिशा आणि महाराष्ट्रातील पोलीस समन्वयाने काम करत आहेत. ( Naxal Action In Bastar forest ) गेल्या 3 वर्षांत, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील इनपुटवर अनेक चकमकी झाल्या आहेत. ज्यामध्ये छत्तीसगड पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दरम्यान, बस्तर जिल्ह्यातील कोडनार येथून माओवाद्यांना डिटोनेटर्स आणि स्फोटके पोहोचवण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे आठवडाभरापूर्वी माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.