ATM Washed Away नदीला आला पूर, २४ लाख रुपयांसह एटीएम गेले पुराच्या पाण्यात वाहून, पहा व्हिडीओ
🎬 Watch Now: Feature Video
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील पुरोळा येथे मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. येथे कुमोला नदीला उधाण आले. त्यामुळे आठ दुकाने वाहून गेली. याशिवाय पीएनबी बँकेचे एटीएमही वाहून गेले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या तहसील प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उत्तरकाशीच्या पुरोला भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कुमोला गडाच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे कुमोला रोडवर असलेल्या दोन ज्वेलर्सच्या दुकानांसह आठ दुकाने वाहून गेली. एवढेच नाही तर पंजाब नॅशनल बँकेचे एटीएमही येथे होते. तेही नदीत वाहून गेले. पीएनबीच्या शाखा व्यवस्थापक चंचल जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळीच या एटीएममध्ये २४ लाख रुपये जमा करण्यात आले. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र, एटीएममध्ये किती रोकड शिल्लक होती, याचा तपास सुरू आहे. ( heavy rainfall in Chharba village ) ( uttarakhand heavy rainfall ) ( SDRF team rescued people ) ( Punjab National Bank ATM ) ( PNB ATM Swept Away in Purola ) ( ATM Washed Away )